घरमुंबईबाईच्या नादापायी आजोबांनी गमावली आयुष्याची पुंजी

बाईच्या नादापायी आजोबांनी गमावली आयुष्याची पुंजी

Subscribe

बाईच्या नादापाई एका ६५ वर्षीय वृद्धाने आयुष्याची 'पुंजी' गमावल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

सध्या बोगस वेबसाईडचा सुळसुळाट वाढल्याच्या घटना घडत असताना एका ६५ वर्षाच्या वृद्धाला या वेबसाईडचा फटका बसल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार पश्चिम उपनगरातील मालाड पूर्व येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या वृद्धाला डेटिंगसाठी महिला हवी असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी या वृद्धाने तब्बल ४६ लाख २५ हजार रुपये देऊ केल्याचे उघडकीस आले आहे. एवढे पैसे गमावून देखील हवं ते न मिळाल्यामुळे वृद्धावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. अखेर कुटुंबियांच्या सांगण्यावरून वृद्धाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध फसवणूक, तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

मालाड पूर्व येथे राहणारे ६५ वर्षीय जेष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह राहण्यास आले आहेत. त्यांचा मुलगा हा परदेशात राहण्यास आहे. सेवानिवृत्तीनंतर घरीच राहणारे वयोवृद्ध यांनी त्यांच्या जवळील स्मार्ट फोनवरून वेबसाईड तपासत असताना त्यांना एक वेबसाईड दिसली. त्यांनी त्या वेबसाइडवर क्लिक करून प्रवेश केला. मात्र रजिस्ट्रेशन केल्या वेबसाइडवरील माहिती मिळू शकत नसल्यामुळे त्यांनी वेबसाइडवर रजिस्ट्रेशन केले असता त्यांना एक मोबाईल क्रमांक मिळून आला आणि पुढे मीरा असे लिहले होते. काही वेळाने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक फोन आला, आणि तिने स्वतःचे नाव मीरा असे सांगितले. तिने त्यांना रजिस्टेशन फी भरण्यास सांगून एका व्यक्तीचा अकाउंट क्रमांक दिला असता त्यांनी ऑनलाईन पेमेंट केला. फी भरल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरील व्हाट्सअँपवर विविध तरुणीचे छायाचित्रे पाठ्वण्यात आली. त्यापैकी एक छायाचित्र निवडण्यास सांगण्यात आल्यावर त्यांनी एका तरुणीचे छायाचित्र निवडून मीरा नावाच्या महिलेला पाठवला. निवडलेल्या तरुणींला भेटण्यासाठी त्यांना २५ हजार रुपये ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले.
मीरा या महिलेने सागितल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी ऑनलाईन रक्कम पाठवली. हा प्रकार तब्ब्ल ८ महिने सुरु होता या आठ महिन्यात मीरा नावाची तसेच विविध नावाच्या महिलांनी कधी मेम्बरशिपच्या नावाखाली तर कधी हॉटेल बुकिंगच्या नावाखाली तर कधी परदेशी महिलेच्या सहवासाच्या नावाखाली वृद्धाकडून थोडेथोडे करून तब्ब्ल ४६ लाख २५ हजार रुपये काढले.

- Advertisement -

वृद्धाने गमावली आयुष्याची ‘पुंजी’

वेळोवेळी पैसे भरून देखील हवं ते मिळत नसल्यामुळे अखेर वृद्धाला संशय आला आणि त्यांनी या वेबसाईडच्या कमेंट बॉक्समध्ये चेक केले असता ही वेबसाईड बोगस असल्याचे मेसेज त्यांना दिसून आले. दरम्यान त्यांनी मीरा नावाच्या महिलेला फोन लावून मला तुमची मेम्बर्शीप वगैरे काही नको माझे पैसे परत करा म्हणून सांगितले असता या महिलेने त्यानंतर मोबाईल नंबर बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाल्यामुळे वृद्धाच्या लक्षात येताच त्यांनी डोक्यला हात मारून घेतला. आयुष्यभर कमावलेली पुंजी एका झटक्यात गेल्यामुळे त्यांना पश्चाताप झालं मात्र हा प्रकार घरच्याना सांगितलं तर घरचे काय बोलतील म्हणून वृद्ध गप्प गप्प तसेच तणावात राहू लागले. अखेर पत्नींनी त्यांना त्यांच्या ताणावाबाबत विचारले असता त्यांनी पत्नीला विश्वासात घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. पतीच्या या कृत्याचा राग तर आला मात्र पतीला धीर देत पत्नीने पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर वृद्धांनी नजीकचे पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला करून तपास सुरु केला आहे.


वाचा – लग्नापूर्वीच शरीरसंबध ठेवाल तर मिळेल ‘ही’ शिक्षा

- Advertisement -

वाचा – बोगस पासपोर्ट आणि व्हिसाद्वारे विदेशात जाण्याचा प्रयत्न


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -