घरमुंबईगुढीपाडव्याच्या शोभायात्रेनिमित्त १ लाख दिपोत्सवाचा संकल्प

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेनिमित्त १ लाख दिपोत्सवाचा संकल्प

Subscribe

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. एक दिवा सैनिकांसाठी या संकल्पनेतून १ लाख दिवे या दिवशी लावण्यात येणार आहे.

गणेश मंदिर संस्थानाच्या वतीने शुभारंभ झालेल्या गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. एक दिवा सैनिकांसाठी या संकल्पनेतून १ लाख किंवा त्याहून अधिक संख्येने दिपोत्सवानिमित्त दिवे लावण्यात यावेत, असे आवाहन गणेश मंदिरातर्फे करण्यात आले. शोभायात्रेच्या निमित्तानेच ‘माझ्या मनातील स्वागतयात्रा’ या स्पर्धेच्या माध्यमातून संस्थानातर्फे आयोजित केलेल्या आतापर्यंतच्या उपक्रमांसंदर्भात नागरिकांची विशेषत: युवकांची मत काय आहेत हे जाणुन घेण्यासाठी व्हाट्सद्वारे ३० शब्दांची मर्यादा देऊन स्पर्धा घेण्यात येणार आहे. कौटूंबिक सलोख्यासाठी सासू सून परिवसंवाद, तसेच आणखी एक परिसंवाद घेण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील मान्यवर परिक्षक म्हणुन लाभले आहेत. ज्येष्ठांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या ठिकाणी आयोजित करणार उत्सव

मुख्य शोभायात्रेमध्ये ६ एप्रिल रोजी पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यासंदर्भात शहरातील विविध सायकलप्रेमी, सायकल क्लब च्या पदाधिका-यांसमवेत बोलणे झाले असून सुमारे १५०हून अधिक सायकलस्वार प्रत्यक्ष शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याने बाईक रॅलीचे देखिल आयोजन करण्यात आले असून ५ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ ते ६ या कालावधीत शहरातील पूर्वेकडून पश्चिमेकडील भागामध्ये विविध ठिकाणी ती रॅली जाणार आहे. भागशाळा मैदान येथे त्या रॅलीचा समारोप होणार आहे. त्यानंतर छ. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन त्याच मैदानात करण्यात आले आहे.

- Advertisement -

यंदाच्या शोभायात्रेतील बदल

यंदाच्या शोभायात्रेमध्ये महत्वाचा बदल म्हणजे बाईक रॅली आदल्या दिवशी आणि ढोला ताशा पथकाला प्रत्यक्ष यात्रेमध्ये सहभागी न करून घेता त्यांना स्थिर वादनासाठी विशेष चौक, हमरस्ते आदी ठिकाणी जागा निश्चित करून देण्यात आली आहे. डोंबिवलीमध्ये वाढणारे प्रचंड तापमान बघता सहभागी होणा-या सर्वच नागरिकांसह ढोल ताशा वादकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय सर्व सहभागी संस्था, संयोजन समिती आणि संस्थानाने एकत्रितपणाने घेतला आहे. जेणेकरून उन वाढायच्या आता सकाळी १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे उपक्रम संपुष्टात यावेत असा प्रायोगिक तत्वावर बदल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -