घरमहाराष्ट्रहिंगोलीत सहा 'सुभाष वानखेडे' निवडणूक रिंगणात

हिंगोलीत सहा ‘सुभाष वानखेडे’ निवडणूक रिंगणात

Subscribe

हिंगोली मतदारसंघातून एक-दोन नव्हे तर तब्बल सहा सुभाष वानखेडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

आगामी लोकसभा मतदारसंघासाठी हिंगोली मतदारसंघातून सहा सुभाष वानखेडे निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. या मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार सुभाष बापूराव वानखेडे यांना आघाडीने तिकीट दिले आहे. या सुभाष वानखडेंना पराभूत करण्यासाठी एक वेगळी खेळी केली आहे. विरोधकांनी सुभाष बापूराव वानखेडे यांच्याविरोधात पाच सुभाष वानखेडे नावाचे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आघाडीच्या वानखेडेंना यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंना बसू शकतो फटका

२०१४ साली शिववसेनेचे सुभाष वानखेडे यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी अन्य दोन सुभाष वानखेडेंना निवडणूक रिंगणात उतरवले होते. या अन्य वानखेडेंनी १२ हजार ५४४ मतं खाल्ली होती. शिवाय, या वानखेडेंमुळे शिवसेनेच्या वानखडेंना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आता देखील विरोधकांकडून अशीच खेळी मांडली जाताना दिसत आहे. यावेळी विरोधकांनी एक-दोन नव्हे तब्बल पाच सुभाष वानखेडेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे काँग्रसचे उमेदवार सुभाष वानखेडे वगळता अन्य पाच सुभाष वानखेडे उभे निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. हे पाचही उमेदवार हिंगोली मतदारसंघातूनच उभे राहिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -