घरदेश-विदेशकोका कोला लवकरच भारतीयांसाठी ताक, लस्सी, पन्हे ही पेय आणणार बाजारात

कोका कोला लवकरच भारतीयांसाठी ताक, लस्सी, पन्हे ही पेय आणणार बाजारात

Subscribe

कोको कोला कंपनी आता भारतीयांच्या आवडीची पेय बाजारात आणत आणत आहे.

शीतपेयांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोको कोला कंपनीने पेयातील भारतीयांच्या रुचिचा विचार करुन काही पेय लवकरच बाजारात आणणार आहे. याआधी कंपनीने जलजीरा लॉंच केला होता. सध्या भारतात गर्मीचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात शीत पेय पीत असतात. त्यातल्या त्यात अंब्याच्या कैरी पासून बनवण्यात येणारे पन्हे लोक आवडीने पितात. त्यामुळे या गरमीच्या दिवसांमध्ये कोको कोला कंपनी पन्हे लॉंच करणार आहे. त्याच बरोरबर लस्सी, ताक अशी दुधापासून बनवली जाणारी पेय देखील कंपनी बाजारात आणणार आहे.

लोकांच्या आवडीला प्राधान्य

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात २९ राज्य असून ही २९ देशांच्या बरोबर आहेत. प्रत्येक राज्याची बोली भाषा वेगळी आहे. त्याच बरोबर खाण्या पिण्याच्या गोष्टींच्या आवडी निवडी देखील राज्यांप्रमाण बदलतात, असे भारत आणि दक्षिण आशियाचे प्रमुख असलेल्या कृष्णा कुमार यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय लोकांना आवडणारी पेय बाजारात आणण्याचा कोको कोला कंपनीचा मानस आहे. मागील तीन वर्षांमध्ये या पेयांच्या विक्रिमध्ये ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे अजून तरी अशा प्रकारची उत्पादने बनवणाऱ्या खुप कमी कंपन्या आहेत. भारताची लोकसंख्या खुप मोठी आहेत. जेवणा नंतर ताक पिणारे, जेवनात दही खाणारे, त्याच प्रमाणे शित पेय म्हणून पन्हे, आमरस पिण्याला लोक प्राधान्य देतात. भारतातील या पेयांना असणारी मागणी आणि लोकांच्या या पेयासाठीच्या रुचिचा विचार करुन कोको कोला ही पेय आणत आहे.

- Advertisement -

ही असतील अव्हाने

थमसप, स्प्राइट, माझा ही शीत पेय भारतात मोठ्या प्रमाणात पिली जातात. तसेच दुग्ध जन्य पदार्थांमध्ये अमूल दुध, मस्का, छास, श्रीखंड या अमूलच्या उत्पादनांना लोकांची पसंती आहे. बंगळुरच्या बेवरेजेस, मुंबईच्या एक्सोटिक फ्रुट जुस, राजस्थान जयंती ग्रुप या कंपन्यांची कोको कोलाला आव्हाने असतील.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -