घरमुंबईऑनलाईनच्या नादात तरुणाला ४८ लाखांची ‘फोडणी’

ऑनलाईनच्या नादात तरुणाला ४८ लाखांची ‘फोडणी’

Subscribe

सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाला ऑनलाईन खरेदीचे आमिष दाखवत तब्बल ४८ लाख ९० हजारांना गंडा घातला गेला आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी सेल्स मॅनेजर ए. आर. कनिश ,मोहम्मद युसुफ, क्लेयरिंग एजंट अरुण जोशी, डीलिव्हरी मेन एलेक्स फिलीप या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली परिसरात राहणारे तक्रारदार यांना ऑगस्ट २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत सोशल मीडियावर ए. आर. कनिश या इसमाने ऑनलाईनच्या माध्यमातून स्वस्तात मोबाईल टीव्ही देण्याचे आमिष दाखवले. स्वस्तात वस्तू मिळत असल्याने संबंधित व्यक्तीने सुरुवातीला काही पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर केले. त्यानंतर विविध कारणे सांगत या भामट्याने तब्बल ४८ लाख ९० हजार १४४ रुपये या तक्रारदाराकडून उकळले. दरम्यान, पैसे नसल्याने तक्रारदाराने विविध बँकेतून कर्ज काढत ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. पैसे दिल्यानंतरदेखील वस्तू मिळाल्या नाहीत. परिणामी, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदराने डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -