घरमनोरंजनचित्रामागची गोष्ट

चित्रामागची गोष्ट

Subscribe

छायाचित्रकार तेजस नेरुरकर याने २६ जानेवारीचे निमित्त घेऊन स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करून देणारे ‘वंदे मातरम्’ हे कॅलेंडर प्रकाशित केलेले आहे. सत्तावीस सेलिब्रिटींचा यात अंर्तभाव आहे. क्रांतिकारकांच्या वेशभूषेत हे कलाकार या कॅलेंडरवर पहायला मिळतात. या निमित्ताने काही कलाकारांनी जागवलेल्या आठवणी म्हणजे ‘चित्रामागची गोष्ट’ वाटायला लागते.

प्रिया बापट
ए. वी. कुट्टीमालु अम्मा या व्यक्तिरेखेत प्रिया बापट पहायला मिळते. छायाचित्रकाराने या व्यक्तिरेखेसाठी प्रियाला बोलावले. तेव्हा ती अचंबित झाली. अम्मा या दक्षिणेकडील क्रांतिवीर आहेत याचा उलगडा त्याच्याकडून झाला. माहीत नसलेली व्यक्तिरेखा साकारायची म्हणजे थोडेसे अडचणीचेच होते. पण ज्याअर्थी छायाचित्रकार अम्माचा तपशील देतो म्हटल्यानंतर फारशी चौकशी करणे, अति जागरुकता दाखवणे मला स्वत:ला महत्त्वाचे वाटले नाही. प्रियाने छायाचित्रकाराने जे सांगितले तशी वेशभूषा, रंगभूषा करून क्रांतिवीराच्या व्यक्तिरेखेला न्याय देताना आनंद होत असल्याचे सांगितले.

पुजा सावंत
प्रितीलता वड्डेदार या व्यक्तिरेखेत पुजा सावंत दिसते. छायाचित्रकाराची संकल्पना आवडली. मी फारसा विचार न करता या व्यक्तिरेखेसाठी होकार दिला होता. त्याचे कारण म्हणजे सौंदर्याचा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर मला आपले फोटोसेशन करायचे आहे तेही विनामूल्य हा त्यांच्याकडून आलेला फोन मला महत्त्वाचा वाटतो. आज चित्रपटात मला जी काही स्थिरता लाभलेली आहे त्यात त्यांच्या छायाचित्राची कमाल आहे. एका चांगल्या कामासाठी पुन्हा आपल्या नावाचा विचार होत आहे हेच मुळात महत्त्वाचे वाटलेले आहे असे पुजा सांगते.

- Advertisement -

शरद केळकर
मंगल पांडेच्या व्यक्तिरेखेत शरद केळकर दिसतो. आजवर शरदने मालिका, चित्रपट, जाहिराती यात काम केलेले आहे. कॅलेंडरसाठी प्रथमच फोटोसेशन केलेले आहे. यासाठी स्वत:हूनच छायाचित्रकाराशी संपर्क साधला. हे कॅलेंडर म्हणजे अनमोल ठेवा आहे. क्रांतिवीरांचे यात स्मरण केलेले आहे. काहीही कर पण एखादी व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला येऊ दे असे शरदचे सांगणे होते. हिंदी, मराठी चित्रपटात बीझी असताना शरदने दाखवलेल्या आत्मियतेमुळे मंगल पांडे त्याने करावा हे त्याला छायाचित्रकाराने सुचवले.

सौरभ गोखले
विनायक दामोदर सावरकर या व्यक्तिरेखेत सौरभ गोखले पहायला मिळतो. सिद्धार्थ जाधव याने छायाचित्रकाराला सौरभचे नाव सुचवले. याचे फोटोसेशन दादरला सावरकर ज्या बंगल्यात वास्तव्य करत होते, तिथे करण्यात आलेले आहे. सावरकरांच्या सूनबाई काही कारणांनी तिथे आल्या होत्या. वेशभूषा, रंगभूषा केलेला सौरभ तिथे वावरतो आहे म्हटल्यानंतर त्यांनी स्वत:हून सौरभला गाठून तुझ्या निमित्ताने सावरकरांची आठवण झाली. त्यांच्या तरुणपणी ते असेच दिसायचे ही प्रतिक्रिया सौरभला अभिमानाची वाटते.

- Advertisement -

उमेश कामत
स्वामी विवेकानंद या व्यक्तिरेखेत उमेश कामत पहायला मिळतो. छायाचित्रकाराने स्वामींच्या व्यक्तिरेखेसाठी ज्यावेळी संपर्क साधला त्यावेळी तपशीलात जाणे मला स्वत:ला महत्त्वाचे वाटले नाही. तेजसने छायाचित्राच्या क्षेत्रात भरपूर असे काम केलेले आहे. या कॅलेंडरच्या निमित्ताने क्रांतिवीरांचे स्मरण करतो आहे. त्याच्या या देशभक्तीच्या कार्यात मलाही सहभागी होता येत आहे याचा मला प्रथम आनंद झाला. स्वामी विवेकानंद हे फक्त भारतालाच परिचयाचे नाहीत तर जगभर त्यांची ख्याती आहे. याचा साक्षीदार मला होता आले याचा आनंद होत आहे.

अभिमान स्वाभिमान
दामोदर हरी चाफेकर(आदिनाथ कोठारे), कॅप्टन लक्ष्मी सहगल(श्रेया बुगडे), सुब्रह्मण्यम भारती(अमेय वाघ), सावित्रीबाई फुले(सई ताम्हणकर), बीरसा मुंडा(प्रियदर्शन जाधव), बेगम हजरत महाल(तेजस्विनी प्रधान), सरदार उधमसिंग(डॉ. अमोल कोल्हे), राजकुमारी गुप्ता(प्राजक्ता माळी), शिवराम हरी राजगुरु(सिद्धार्थ जाधव), मनीबेन पटेल(स्पृहा जोशी), बाळ गंगाधर टिळक(सुनिल बर्वे), अशफाकउल्ला खान(अक्षय टांकसाळे), दुर्गा भाभी(ऊर्मिला कानेटकर), कनकलता बरुआ (सोनाली कुलकर्णी), कल्पना दत्त(श्रीया पिळगावकर), सुभाषचंद्र बोस(सागर देशमुख), कित्तूर रानी चिन्नम्मा(नेहा महाजन), चंद्रशेखर आझाद(प्रवीण तरडे), उमाबाई कुंदापूर(प्रियंका बर्वे), वासुदेव बळवंत फडके(ललीत प्रभाकर), अजीजान बाई(हृता दुर्गुळे), गुलाबकौर(अर्चना पनिया) यांच्याही व्यक्तिरेखा या कॅलेंडरमध्ये पहायला मिळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -