घरमुंबईफेरपरीक्षेत उतीर्ण विद्यार्थ्यांना संधी

फेरपरीक्षेत उतीर्ण विद्यार्थ्यांना संधी

Subscribe

16 ते 30 सप्टेंबरपर्यंत आयटीआय प्रवेश प्रक्रिया

दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या परीक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी आयटीआयने 23 ऑगस्ट रोजी पूर्ण झालेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयने 16 सप्टेंबरपर्यंत प्रवेशासाठी संधी उपलब्ध केली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 17 ते 30 जुलैदरम्यान घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फेरपरीक्षेला (दहावी) राज्यातून 2 लाख 21 हजार 629 विद्यार्थी बसले होते. त्यातील 50 हजार 667 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये व त्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने सरकारी आयटीआयमधील प्रवेशाची मुदत 16 सप्टेंबर तर खासगी आयटीआयची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी सुरू असलेली आयटीआयची प्रवेशप्रक्रिया 23 ऑगस्टला संपुष्टात आली होती. मात्र फेरपरीक्षेचा निकाल लागल्यानंतर प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

- Advertisement -

सुधारित वेळापत्रक
• रिक्त जागांवरील प्रवेशासाठी अर्ज व अर्ज निश्चिती : 4 ते 11 सप्टेंबर
• गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर : 12 सप्टेंबर
• संस्थास्तरावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 13 सप्टेंबर
• जागा बहाल व प्रवेश घेण्याची मुदत : 14 सप्टेंबर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -