घरताज्या घडामोडीतलावांवरील ट्युरिझमला विरोधाचा सूर; दहशतवादी हल्ल्यामुळे खबरदारी

तलावांवरील ट्युरिझमला विरोधाचा सूर; दहशतवादी हल्ल्यामुळे खबरदारी

Subscribe

दहशतवादी हल्ल्याच्या खबरदारीमुळे तलावांवरील ट्युरिझमला बंदी करण्यात आली आहेत.

तानसा, वैतरणा, मोडकसागर धरणांच्या ठिकाणी यापूर्वी नगरसेवकांसह काही मान्यवरांना तेथील अतिथीगृहाचा वापर करण्यास जलअभियंता विभागाच्यावतीने परवानगी दिली जायची. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्ती याठिकाणी आनंद लुटण्यासाठी जायचे. परंतु, १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने या विभागांना अतिसंवेदनशील घोषित करून जलअभियंता विभागाशिवाय कुणालाही तिथे जाण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, तेव्हापासून बंद पडलेली ही प्रथा पुन्हा सुरु करुन याठिकाणी सायकल टूर, बोटींगसह नेचर ट्रेल, बर्ड वॉचिंग, स्टार गेझिंग आदी प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत ट्युरिझम वॉटर पॅकेजची घोषणा आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

जलवाहिनींच्या सुरक्षेसाठी नेमले होते सुरक्षा रक्षक

महापालिकच्या एका निवृत्त जलअभियंता यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पर्यटनाला चालना म्हणून तानसा, मोडकसागर आणि वैतरणाच्या संवेदनशील जागा सर्वसामान्यांना मोकळेपणाने फिरण्यास दिले जाणार आहे. परंतु या पर्यटनाच्या माध्यमातून जर एखादा आत्मघाती हल्ला झाल्यास संपूर्ण मुंबईच्या पाण्याचे नियोजन फसले. पाण्याचे तलाव आणि पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिनी यांची सुरक्षा ही महत्वाची असून पर्यटन क्षेत्र म्हणून ही ठिकाणे मोकळी करून दिल्यास त्याठिकाणाला धोका संभवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तर अन्य जलअभियंता विभागाच्या आणखी एका निवृत्त अधिकार्‍यांने आणि प्रशासनाने, याठिकाणी बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशबंदी का केली होती याची माहिती जाणून घ्यावी, असे म्हटले आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून अन्य बाबींचा विचार व्हावा, अन्यथा याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही उपाययोजना न केल्यास मुंबईला धोका आहे. त्यामुळे ही ठिकाणे पर्यटकांसाठी खुली ठेवली जावू नये, असाही सूर त्यांनी आळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; दोन जण गंभीर जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -