घरताज्या घडामोडीदेश प्रेमासाठी 'दबंग भाईने' रद्द केला अमेरिकेतील कार्यक्रम

देश प्रेमासाठी ‘दबंग भाईने’ रद्द केला अमेरिकेतील कार्यक्रम

Subscribe

दबंग स्टारने अमेरिकेतील आपला शो रद्द केला आहे. हा शो रेहान सिद्दीकी या एका पाकिस्तानी आयोजकाने अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये आयोजित केला होता. सलमान खानने पुन्हा एकदा आपली देशभक्ती सिद्ध केली आहे.

आपल्या चाहत्यांना कधीही निराश न करणारा कलाकार म्हणून ख्यातनाम असलेला बॉलिवूडचा दबंग स्टार, सलमान खानने पुन्हा एकदा आपल्या देशाची बाजू घेऊन अनेकांची मने जिंकली आहेत. सर्वांचा आवडता अभिनेता म्हणून ओळख असलेला सलमान उर्फ ‘भाई’ हा पाकिस्तानशी संबंध टिकवण्याचा विषय आल्यावर देशाशी एक निष्ठ राहण्याबाबत कायम ठाम असतो.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दबंग स्टारने अमेरिकेतील आपला शो रद्द केला आहे. हा शो रेहान सिद्दीकी या एका पाकिस्तानी आयोजकाने अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये आयोजित केला होता. मात्र, सलमानने तो रद्द केला आहे. रेहान सिद्दीकी अमेरिकेतील भारतविरोधी कार्यांसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कार्यक्रमांतून निधी गोळा करीत असल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

यापूर्वी देखील बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार हा खुलासा झाला होता की, दबंग ३ च्या रिलीजच्या वेळी सलमानने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला या सिनेमातून वगळण्यात आले. याने यापूर्वी ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ आणि ‘तोरे नैना बडे दगाबाज रे’ हे गाणे गायले होते. एका वृत्त संथ्येने दिलेलया माहितीनुसार, जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला तेव्हा एक अनधिकृत निर्णय घेण्यात आला की, सीमेच्या पार्श्वभूमीवर या गायकांसोबत काम करणे बंद करावे. राहत साब एक पाकिस्तानी असल्याने सलमानने आणि संपूर्ण टीमने त्यावेळीस त्याला वगळून त्याऐवजी दुसर्‍या गायकाला निवडलं होतं. येणाऱ्या काळात सलमान लवकरच राधे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावर्षी ईदच्या मुहुर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटात दिशा पटानी आणि रणदीप हूडा देखील आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -