लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; दोन जण गंभीर जखमी

लोकलमधून पडून एका प्रवाशाला जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

one dead and two injured after falling down of local train between mumbra and kalva railway stations
लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी

लोकलमधील गर्दीमुळे डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरूणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना आज घडल्याचे समोर आले आहे. ही घटना मध्य रेल्वेच्या कळवा – मुंब्रा स्थानका दरम्यान कळवा फाटक येथे घडल्याचे समोर आले आहे. अपुऱ्या लोकल आणि वाढत्या गर्दीमुळे लोकलमधून पडून जीव गमवावा लागल्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचे आणखी किती बळी घेणार? असा संतप्त सवाल प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.

नेमके काय घडले?

मध्य रेल्वेच्या कळवा – मुंब्रा स्थानका दरम्यान कळवा फाटक येथे एकूण तीन प्रवासी लोकलमधून पडल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यापैकी एकाला आपला जीव गमवावा लागला असून हाजी रईस अहमद (५२) असे या व्यक्तीचे नाव आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात जखमी झालेले प्रवासी हे मुंब्रा येथे राहणारे आहेत. दरम्यान, कल्याणकडून आधीच गर्दीने भरुन आलेल्या लोकलमध्ये कळवा स्थानकात मोठ्या संख्येने प्रवासी चढले. मात्र, या रेटारेटीत प्रवाशी लोकलबाहेर फेकले गेले असल्याचे प्रतियक्षदर्शींनी सांगितले आहे.


हेही वाचा – VIDEO – ही लढाई आहे…मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज