घरमुंबईठाण्यात सेलिब्रिटी लीग सामने

ठाण्यात सेलिब्रिटी लीग सामने

Subscribe

मंचावरून कलाकार उतरणार क्रिकेटच्या मैदानात

ठाण्यातील महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त ठाण्यात पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर कलाकारांचे महाराष्ट्र सेलिब्रिटी लीग क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. या सामन्यांचे आयोजन ठाणे महानगरपालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर व संदीप जुवाटकर यांनी केले आहे. डी. बी. एन्टरटेन्मेंटचे दिलीप भगत लीगचे सहआयोजक आहेत. या स्पर्धेत 6 संघ असून यामध्ये ‘मुंबईचे मावळे’ कर्णधार संजय जाधव,‘बाणेदार ठाणे’ कर्णधार अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ कर्णधार सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ कर्णधार महेश लिमये, ‘पराक्रमी पुणे’ कर्णधार सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ कर्णधार विनोद सातव यांचा सहभाग असणार आहे.

नूतनीकरण करण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन ठाणे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती दिपक वेतकर, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला पिंपळोलकर, माजी क्रिकेटपट्टू संजय मांजरेकर, राजू कुलकर्णी आणि क्रिकेटपटू अभिषेक नायर आदी उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्यावतीने या स्टेडियममध्ये आगामी काळात आयपीएलमधील काही संघ सराव करणार आहेत. भविष्यात रणजी क्रिकेटचे सामने या मैदानात होतील. या दृष्टीने सेलिब्रिटी लिगच्या सामन्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -