घरमुंबईमोबाईलच्या अति वापरामुळे मुलांच्या डोळयांवर परिणाम - डॉ. लहाने

मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांच्या डोळयांवर परिणाम – डॉ. लहाने

Subscribe

सध्या वाढलेल्या जंक फूडच्या अति सेवनामुळे आरोग्याचे प्रश्न वाढत आहे, अशी डॉ. तात्याराव लहाने यांनी खंत व्यक्त केली आहे.

सध्या मोबाईलचा अति वापर होत आहे. त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणार झाला आहे. घरात आल्यावर मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कुटुंबा बरोबर संवाद साधल्यास मुलांच्या आरोग्याला अधिक फायदा होईल असं डॉ. लहाने यांनी सांगितलं. जंक फूडच्या अति सेवनामुळे आरोग्याचा प्रश्न सध्या वाढला आहे. बदलत्या खाण्याच्या सवयी आणि एकत्र कुटूंब पद्धतीचा अभाव यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे असंही प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं. डोंबिवली येथील आश्रय चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लहाने बोलत होत.

- Advertisement -

गरीब रुग्णांना मोफत चष्मे वाटप आणि ऑपरेशन

डोंबिवली एमआयडीसीमधील ना नफा ना तोटा पद्धतीवर सेवा देणाऱ्या आश्रय चॅरिटेबल ट्रस्टमध्ये डॉ. लहाने यांच्या हस्ते दोन अत्याधुनिक मशीनचे उद्घाटन करण्यात आले. म्हैसकर फाऊंडेशनच्या भरीव आर्थिक सहाय्यातून झाईस कंपनीचे मायस्क्रोप आणि फेको मशिन आश्रय ट्रस्टला देण्यात आलं आहे. लक्ष्मीनारायण ट्रस्ट तर्फे दरवर्षी डायलायसिस पेशंटसाठी पन्नास हजार रूपये तर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व तर्फे दरमहा साधारणतः पंधरा ते वीस हजार रूपये आणि खेडेगावात नेत्र तपासणी शिबिर, गरीब रुग्णांना मोफत चष्मे वाटप आणि ऑपरेशन करण्यात येणार आहेत. या दोन्ही मशिनमुळे डोळ्यातील मोतीबिंदूवर अधिक चांगल्या पद्धतीने ऑपरेशन करण्यात येणार आहेत.

वैज्ञानिक पुर्नजन्म हवा असेल तर प्रत्येकानं मरणोत्तर नेत्रदान करावे

डॉ. लहाने यांनी म्हैसकर फाऊंडेशनचे या देणगीबाबत कौतुक केलं. तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सूचनाही उपस्थितांना दिल्या. आपल्या देशात अवयव दानाची चळवळ व्यापक व्हायला हवी. एक माणूस सात जणांना जीवदान देऊ शकतो. वैज्ञानिक पुर्नजन्म हवा असेल तर प्रत्येकानं मरणोत्तर नेत्रदान करावे असं आवाहन डॉ. लहाने यांनी केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -