घरमुंबईपाठलाग करुन त्रास दिल्याप्रकरणी गायिकेच्या फॅनला अटक

पाठलाग करुन त्रास दिल्याप्रकरणी गायिकेच्या फॅनला अटक

Subscribe

सुप्रसिद्ध गायिका पलक मुछालला त्रास दिल्या प्रकरणी तिच्या एका फॅनला पोलिसांनी अटक केली आहे. राजेश कुमार शुक्ला (३०) असे या चाहत्याचे नाव असून तो मुळ बिहार येथील रहिवासी आहे. दरम्यान आंबोली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कलम ३५४ ड (पाठलाग करणे) आणि ५०६ (फौजदारी धमकी) अंतर्गत आरोपीला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शुक्लाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने फोन डिरेक्टरीच्या मदतीने पलकचा मोबाईल नंबर मिळवला. शुक्ला पलकच्या फोनवर मेसेज करुन तिला भेटण्यासाठी बोलावत होता. मात्र तिने भेटण्यास नकार दिल्यामुळे त्याने मेसेजद्वारे तिला शिवीगाळ केली. तसेच पलकच्या घरचा पत्ता त्याच्याकडे असून त्याने तिच्या घरी येण्याचीही धमकी दिली. मागील काही दिवसांपासून शुक्ला तिच्या इमारतीजवळही फिरकत असल्याने घाबरुन अखेर या माथेफिरु विरोधात पलकने आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर आंबोली पोलिसांनी सापळा रचून या माथेफिरुला अटक केली आहे.

- Advertisement -

कोण आहे पलक मुछाव
‘आशिकी २’, ‘प्रेम रतन धन पायो’ अशा चित्रपटातील गीतांच्या माध्यमातून आपल्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकले. ‘जुम्मे की रात है’, ‘फोटोकॉपी’, ‘गोरी तु लाथ मार’, ‘लापता मेरी आशिकी’ ही गाणी गायली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -