घरदेश-विदेशगोळीबार हल्ल्यातून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना कवितेतून धडे

गोळीबार हल्ल्यातून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना कवितेतून धडे

Subscribe

अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फ्लोरिडामधील एका हायस्कूलमध्ये १४ फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये १७ विद्यार्थी ठार झाले होते. याप्रकारची घटना शाळेमध्ये घडल्यास विद्यार्थांनी काय करावे? हे विद्यार्थांना कळत नाही. विद्यार्थी घाबरून जातात. मात्र त्यांना कळेल, उमजेल अशा भाषेत एखाद्या विषयाची कल्पना दिल्यास विद्यार्थी त्याचे अनुकरण करतात.

एका पाच वर्षाच्या मुलीच्या आईने ‘लॉकडाऊन’ या नावाची कविता रचली आहे. या कवितेमध्ये अनपेक्षित हल्ला झाल्यास काय काय करावे हे सचित्र दाखवण्यात आले आहे. ही कविता एका बोर्डवर चित्रासहित रेखाटण्यात आली आहे. जॉर्जी चोहेन या महिलेने ही पोस्ट ट्विट केली आहे. या कवितेला २४ तासात तब्बल १८ हजार लोकांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

कवितेत काय लिहीले आहे?

या कवितेमध्ये दरवाजा लावा. लाईट बंद करा. शांत रहा. टेबलच्या मागे लपा आणि जो पर्यंत बाहेरील वातावरण शांत झालेले नसेल तो पर्यंत बाहेर येऊ नका, अशा सहज आणि सोप्या शब्दात सांगण्यात आले आहे. त्यामुळे चिमुरड्यांना सहज कळेल अशा शब्दात लिहीली गेली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -