घरमुंबईपनवेलमध्ये एकूण 3 हजार 104.50 पावसाची नोंद

पनवेलमध्ये एकूण 3 हजार 104.50 पावसाची नोंद

Subscribe

पावसाचे 9 बळी 28 घरांची पडझड

पनवेलमध्ये 12 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची नोंद 3104.50 मिमी इतकी झाली आहे. यात मुसळधार पर्ज्यन्यवृष्टीमुळे पनवेल तालुक्यामध्ये 9 जणांचा बळी गेला आहे. तर 28 जनावरे वाहून गेली तसेच काही विजेचा शॉक लागून दगावली आहेत. पनवेल तालुक्यात एकूण 28 घरांची पडझड झाली असून तब्बल 1 हजार 200 घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले होते. यामधील 325 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले असून तालुक्यामध्ये महसूल विभागामार्फत करण्यात आलेल्या पंचनाम्यामधून जवळपास 4 ते 5 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेलमधील खारघर येथे 4 पर्यटक मुलींना आपला जीव गमवावा लागला होत. तर ओएनजीसी येथे झाड पडून एकाच दुर्दैवी अंत झाला. तसेच उमरोली येथे एक दाम्पत्य दुचाकीसह वाहून गेल्यानंतर त्यांचे मृतदेह जुई खाडीमध्ये तर महिलेचा मृतदेह बेलापूरच्या खाडीमध्ये आढळला.

- Advertisement -

याचबरोबर तालुक्यातील उसर्ली येथेही एकजण पुरात वाहून गेला तर वाजे परिसरात एक पर्यटक पोहता येत नसतानाही पाण्यात उतरल्याने त्याचा अंत झाला. यावेळी तालुक्यातील खैरवाडी येथे 1 आणि मोरबे येथे 2 बैल, म्हैस 1 आणि तालुक्यातील इतर भागात छोटी जनावरे ज्यामध्ये प्रामुख्याने बकरी, बोकड अशी तब्बल 23 जनावरे वाहून गेल्याचे समोर आले आहे. मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर पनवेल शहरासह तालुक्यातील तब्बल 1200 घरांमध्ये पाणी घुसले होते. यामधील 325 कुटुंबांना शासकीय मदतीने स्थलांतरित करण्यात आले आहे.

यावेळी तालुक्यातील एकूण 28 घरांची पडझड झाली असल्याचे सांगत एकूण नुकसानीचा आकडा हा 4 ते 5 कोटींच्या घरात पोहोचला आहे. पनवेलमध्ये 12 जून पासून सुरु झालेल्या पावसामध्ये सर्वाधिक म्हणजे 265.2 पावसाची नोंद ही 27 जुलै रोजी पडलेल्या पावसाची झाली आहे. गाढी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुसलमान नाका, कच्ची मोहल्ला, बंदर रोड, कोळीवड्यातील घरांमध्ये पाणी घुसले. यावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -