घरमुंबईपराग शहा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

पराग शहा सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Subscribe

मंगलप्रभात लोढांनाही मागे टाकले

घाटकोपर (पूर्व) येथून विधानसभा निवडणूक लढणारे भाजप उमेदवार पराग शहा हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ५४३ कोटी ७६ लाख ४२ हजार ३४३ रुपये आहे. त्यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (एकूण संपत्ती ४४१ कोटी) यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे मंगलप्रभात लोढा हे मागील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले होते. शहा यांनी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती तब्बल ६९० कोटी रुपयांची होती आणि नगरसेवकाची निवडणूक लढवणारे ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले होते.

पराग शहा यांनी २०१७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती तब्बल ६९० कोटी रुपयांची होती आणि नगरसेवकाची निवडणूक लढवणारे ते सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले होते. त्यातुलनेत यावेळी शहा यांच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून येते. पराग शहा यांच्याकडे फरारी गाडी आहे. पण ती गाडी ते स्वत: वापरत नाहीत. ती गाडी त्यांची पत्नी वापरते आणि शहा हे स्कोडा गाडीतून फिरतात, असे प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आले आहे. आपण पेशाने व्यावसायिक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

- Advertisement -

गेल्या आर्थिक वर्षात त्यांना १३ कोटी ७८ लाख ९३ हजार ६७ रूपये इतके उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी आयकर विभागाकडे सादर केली आहे. पराग शहा यांनी त्यांचे कौटुंबिक उत्पन्न ३० कोटी ६० लाख कोटी रुपये इतके आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे १७५ कोटी रूपयांची संपत्ती दाखवण्यात आली आहे.

५४३ कोटी ७६ लाखांची मालमत्ता

रोख २ लाख ९ हजार. बँकेतील ठेव ५४ लाख ३५ हजार ४६२
गुंतवणूक रोखे २ कोटी ७० लाख ६६ हजार ७३९
शेअर्स (लिस्टेड) १९९ कोटी ९४ लाख २२ हजार १९५
शेअर्स (अनलिस्टेड) २ कोटा २१ लाख ६६ हजार ५५९
पीपीएफ खाते ४८ लाख ७८ हजार ३७२
एलआयसीमध्ये गुंतवणूक ४ कोटी २५ लाख ९ हजार ६५५
वाहन स्कोडा रॅपिड ८ लाख ९८ हजार, चांदी १ लाख ७ हजार ८१९
सोने ६३ लाख १४ हजार १५६, हिरे ५९ लाख ३ हजार ९४२
जंगम मालमत्ता : २३९ कोटी २४ लाख १९ हजार १६८ रूपये
स्थावर मालमत्ता २० कोटी ६८ लाख ४२ हजार ६०१ रूपये

- Advertisement -

घाटकोपरमध्ये मेहतांच्या कार्यकर्त्यांचा राडा
घाटकोपर पूर्वमधील विद्यमान आमदार आणि माजी मंत्री प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी पराग शहा यांना तिकीट दिल्यानंतर घाटकोपर पूर्वेतील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दुफळी माजली आहे. प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना तिकीट नाकारल्याबद्दल मोठी नाराजी पसरली होती. त्याचाच उद्रेक शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाला. घाटकोपर पूर्वमध्ये पराग शहा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीची प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. प्रकाश मेहतांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी इच्छा आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या प्रकारामुळे स्थानिक भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून त्याने आता हिंसक वळण घ्यायला सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -