घरमुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदींची २६ एप्रिलला मुंबईत सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची २६ एप्रिलला मुंबईत सभा

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २६ एप्रिल रोजी वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार असून या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २६ एप्रिल रोजी वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार असून यांची प्रमुख भाषणे देखील होणार आहेत. त्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेही सभेला उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा ‘भीमटोला’ ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. आज भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसभा मतदारसंघात २२ पदयात्रा

भाजपच्या तीन लोकसभा मतदारसंघात २२ पदयात्रा झाल्या असून प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघात वेगवेगळ्या पदयात्रा करत आहे. तसेच आतापर्यंत सुमारे ४७ पदयात्रा झाल्या असून १४० ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत. तर तीन लोकसभा मतदारसंघात ९० चौक सभा झाल्या आहेत. प्रत्यक्ष नागरिकांना भेटीगाठी ५५० ग्रुप मिटींग घेण्यात येत आहेत अशी माहिती आशिष शेलार त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -