घरमुंबईसांताक्रुज येथे डान्स बारमध्ये पोलिसांचा छापा

सांताक्रुज येथे डान्स बारमध्ये पोलिसांचा छापा

Subscribe

पंधराजणांना अटक तर अकरा बारबालांची सुटका

सांताक्रुज येथे एका डान्स बारवर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून पंधराजणांना अटक केली तर अकरा बारबलांची सुटका केली. अटकेनंतर या सर्वांचा ताबा सांताक्रुज पोलिसांकडे देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. सांताक्रुज येथील गजझरबांधमध्ये गोल्डन बीन या बारमध्ये अश्लील गाण्यावर काही बारबाला तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत अश्लील कृत्य करीत असल्याची माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील गावडे, जाधव, कोरे, काकडे, सावंत, शेख, नाईक, हाक्के, पवार, महिला शिपाई लाड यांनी गोल्डन बीन या डान्स बारवर छापा टाकला होता.

- Advertisement -

या छाप्यात पोलिसांनी एक बार मॅनेजर, एक कॅशिअर, दोन सुपरवायझर, एक बारमन, चार वेटर आणि सहा ग्राहक अशा पंधराजणांना अटक केली. यावेळी तिथे अकरा बारगर्ल ग्राहकांसोबत अश्लील गाण्यावर चाळे करताना दिसून आले होते, त्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी 82 हजार 840 रुपयांची कॅश, एक लॅपटॉप, एक एम्पलीफायर, एक स्पिकर, एक शूटींग मेमरी कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -