घरमुंबईनेत्यांना महाराजांचा पडला विसर; मग युवकांनींच घेतला पुढाकार

नेत्यांना महाराजांचा पडला विसर; मग युवकांनींच घेतला पुढाकार

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी दिनी कल्याण शहरातील अश्वारूढ पुतळ्याच्या पूजनाचा नेत्यांना विसरपडला होता.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान, त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव देशात नव्हे तर जगभरातून अभ्यासला जातो. त्यांचे नाव घेऊन असंख्य राज्यकर्त्यांचे राजकारण चालते, परंतु शिवजयंती आणि शिवाजी महाराज पुण्यतिथी या दोन्ही दिवशी विसर पडला तो भिवंडी कल्याण सीमेवरील कल्याण महानगरपालिके कडून उभारण्यात आलेल्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनाचा. राजकारणी आणि महापालिकेला देखील याचा विसरपडल्याने भिवंडीतील सुधीर गळवे या युवकाच्या नजरेस त्यांच्या टायगर्स ग्रुप च्या माध्यमातून ही गोष्ठ लक्षात आली. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी सदरच्या ठिकाणी आपल्या मित्रांसह जाऊन पाण्याने पुतळा स्वच्छ करीत, मानवी मनोरा उभा करुन महाराजांना पुष्पहार अर्पण केला.

सोयीस्कर पणे दुर्लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराद्य दैवत त्यांच्या पूजनासाठी सर्व समाज नेहमीच आग्रही असतो, सर्वत्र त्यांच्या नावाने राजकारण्यांचे राजकारण होते, सत्ता मिळते. परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांना सोयीस्कर पणे दुर्लक्षित केले जातअसल्याचे काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी कल्याण सीमेवरील दुर्गाडी खाडी पुला नजीक कल्याण महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या आहे. ०३ एप्रिल १६८० या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले होते. त्यामुळे महाराज्यांच्या पुण्यातिथीच्या दिवशी त्यांच्या स्मारकांचे पूजन व्हावे अशी माफक अपेक्षा शिवप्रेमींची असते. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ पूजनासाठी कोणी फिरकलेच नाही.

- Advertisement -

टायगर ग्रुपने घेतला पुढाकार

ही बाब भिवंडी शहरातील टायगर ग्रुप या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या युवकांना समजली असता, सुधीर गळवे पुढाकार घेत तात्काळ त्या ठिकाणी सदानंद गुळवी, प्रकाश सपकाळे आणि इतर युवकां सोबत पोहचले. तेथील पाण्याने सर्वप्रथम पुतळा स्वच्छ करुन त्यानंतर मानवी मनोरा उभारीत छत्रपतींना पुष्पहार अर्पण केला. विशेष म्हणजे २३ मार्च रोजी तिथी प्रमाणे साजरी होणारी शिवजयंती सर्वत्र उत्साहात साजरी होते. मात्र त्या दिवशी सुध्दा हे अश्वारुढ स्मारक दुर्लक्षित राहिले होते. रात्री उशिरा सुधीर गळवे या युवकास हा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आल्यावर त्याने त्याच रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी पोहचून, नजीकच्या हॉटेल चालकाकडून बादली भरुन पाणी आणून पुतळा स्वच्छ करुन पुष्पहार अर्पण केला होता. या प्रकाराने सुधीर गळवे याने चिंता व्यक्त करीत २३ मार्च रोजी घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती आज होते हे दुर्दैवी असल्याचे सांगत ,सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपतींच्या स्मारकाकडे अशी डोळेझाक होण्याबद्दल संताप व्यक्त करीत, समाजाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांची काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -