घरमुंबईभिवंडीत राजकीय भूकंप; चार नगरसेवकांच्या आघाडीचा 'महापौर'

भिवंडीत राजकीय भूकंप; चार नगरसेवकांच्या आघाडीचा ‘महापौर’

Subscribe

काँग्रेसच्या बंडखोरांनी पक्षाचा व्हीप पायदळी तुडवत भाजपच्या वतीने कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांची महापौरपदी निवड केली आहे.

राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरून देखील विरोधात बसण्याची नामुष्की ओढवलेल्या भाजपने भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ‘आघाडी’ घेतली आहे. काँग्रेसच्या बंडखोरांनी पक्षाचा व्हीप पायदळी तुडवत भाजपच्या वतीने कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांची महापौरपदी निवड केली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे. प्रतिभा पाटील यांना एकूण ४९ मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार रिषिका राका यांना ४१ मतं मिळाली. काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

अशी झाली बंडखोरी

भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेसच्या एकहाती सत्तेला कोणार्क विकास आघाडीकडून आव्हान देण्याचे प्रयत्न सुरु होते. महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या रिषिका राका, कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील, तर शिवसेनेच्या वंदना मनोज काटेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. रिषिका राका यांना मतदान करण्यासाठी काँग्रेसने नगरसेवकांना व्हीपदेखील जारी केला होता. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांचा विजय झाला आहे.

- Advertisement -

उपमहापौरपदी काँग्रेसचाच बंडखोर

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर उपमहापौरपदाची माळ काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांच्या गळ्यात पडली. इमरानवल्ली यांना एकूण ४९ मतं मिळाली तर शिवसेनेचे बालाराम मधुकर चौधरी यांना ४१ मतं मिळाली.

महापालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस – ४७
शिवसेना – १२
भाजप – २०
कोणार्क विकास आघाडी – ४
समाजवादी पार्टी – २
आरपीआय (एकतावादी)- ४
अपक्ष – १

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -