घरमुंबईधारावीत ३ हजार लोकांसाठी क्वारंटाईन कक्षाची आवश्यकता; जागेचा शोध सुरू

धारावीत ३ हजार लोकांसाठी क्वारंटाईन कक्षाची आवश्यकता; जागेचा शोध सुरू

Subscribe

सध्या १००० लोकांच्या क्वारंटाईनची व्यवस्था असलेल्या महापालिकेला आता येत्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन हजार लोकांच्या क्षमतेचे क्वारंटाईन कक्ष तयार करावे लागणार

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे या भागाची केंद्रीय आरोग्य पथकाने पाहणी केली. मात्र, वरळी कोळीवाड्यातील घटना पाहता, या पथकाने महापालिकेला धारावीत अॅलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत सुमारे पाच हजार लोकांना क्वारंटाईन करण्याची गरज भासणार आहे. त्या दृष्टीकोनातून क्वारंटाईन कक्षाची व्यवस्था करण्याचे निर्देश या पथकाने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे सध्या १००० लोकांच्या क्वारंटाईनची व्यवस्था असलेल्या महापालिकेला आता येत्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन हजार लोकांच्या क्षमतेचे क्वारंटाईन कक्ष तयार करावे लागणार आहे. त्यामुळे धारावीसह आसपासच्या परिसरात हॉटेल, लॉज तसेच जिमखाना आदींचा शोध घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह केंद्रीय आरोग्य पथकाने धारावीतील राजीव गांधी स्पोर्टस क्लब, साई हॉस्पिटलसह क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. यावेळी क्वारंटाईन कक्षातील रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा सुविधांसह केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनाग्रस्त आढळून आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचीही माहिती घेतली. तसेच बाधित क्षेत्रातील लोकांना जेवणाची पाकिटे व जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपांचीही माहिती घेतली.

- Advertisement -

२ ते ३ हजार क्षमतेच्या क्वारंटाईन कक्षाची शिफारस

या केंद्रीय पथकाची शिवाजीपार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक पार पडली. यावेळी या पथकाने धारावीत रेशन सुविधा व अन्य प्रकारच्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. परंतु या ठिकाणी अजुनही दोन ते तीन हजार क्षमतेचे क्वारंटाईन कक्ष तयार करण्याचाही शिफारस केली आहे. धारावीची झोपडपट्टी दाटीवाटीने वसलेली असल्याने एकाला प्रार्दुभाव झाल्यास त्याची बाधा अनेकांना होण्याची शक्यता लक्षात घेता या पथकाने एक रुग्ण आढळून आल्यास त्या परिघातील सर्वांनाच क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे भविष्यात धारावीत अधिक क्वारंटाईनची गरज भासणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मुंबईत होणार रुग्णसंख्येचा विस्फोट, १५ मेपर्यंत असतील ६.५ लाख कोरोनाग्रस्त!

त्यानुसार महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना निर्देश देत धारावीत जास्तीत जास्त क्वारंटाईनची व्यवस्था करण्यास सांगितले. वरळी कोळीवाड्यात पहिला रुग्ण २१ मार्चला मिळाला होता.त्यानंतर १ एप्रिलनंतर याठिकाणी रुग्णांची संख्या वाढू लागली. तसेच धारावीत पहिला रुग्ण ५ एप्रिल रोजी आढळून आला. त्यामुळे २० एप्रिलनंतर येथील रुग्णांची संख्या अधिक होण्याची शक्यता असून त्यासाठी सुमारे ५ हजार व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना या पथकाने केल्याचे समजते.

- Advertisement -

क्वारंटाईन कक्ष वाढवण्याचा आयुक्तांचा निर्देश

केंद्रीय पथकाने महापालिका आयुक्तांना धारावीबाबत काही शिफारशी केल्या आहे, त्यानुसार आयुक्तांनी क्वारंटाईन कक्षांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहे. सध्या धारावीत १ हजार क्षमतेची क्वारंटाईन कक्ष आहेत. तसेच राजीव गांधी स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या मैदानासह ट्रान्झिट कॅम्प शाळेसह दोन जागांमध्ये क्वारंटाईन कक्ष तयार केले जात आहे. त्यामुळे अजून २०० लोकांची व्यवस्था होईल. त्यामुळे आतापर्यंत १२०० जणांचे क्वारंटाईन कक्ष होऊ शकते,असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे धारावीतील हॉटेल, लॉजसह इतर जागा ताब्यात घेण्याचे नियोजन होत आहे.

महापालिका आयुक्तांनी धारावीपासून १ कि.मी अंतरापर्यंत जागा ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल, शीव, दादर व माहिम आदी भागांमधील हॉटेल, लॉज, बांधकाम पूर्ण झालेल्या रिकाम्या इमारती, जिमखाना आदी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया राबवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे अजुन २ ते ३ हजार जणांच्या क्षमतेच्या जागांचा शोध घेवून त्याठिकाणी क्वारंटाईन कक्ष तयार केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -