घरमुंबईआरेला पर्यायी कारशेडसाठी ५ जागांची रेकी

आरेला पर्यायी कारशेडसाठी ५ जागांची रेकी

Subscribe

मेट्रो- ३ साठी आणखी १० दिवसांत अहवाल अपेक्षित

मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पूर्ण होण्याअगोदच वादाच्या भोवर्‍यात सापडला तो आरेतील कारशेडमुळे.या जागेला विरोध झाल्यानंतर आधीच्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा निर्णय रद्द करत आताच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आरेमध्ये कारशेड होणार नाही अशी घोषणा केली. त्यानंतर आरेसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. त्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल तयार करण्यासाठी सुरूवात केली आहे.समितीने आतापर्यंत सहा ठिकाणी कारशेडच्या जागेसाठी भेटी दिल्या आहेत.

आता समितीच्या मेट्रो ३ प्रकल्पासाठीच्या कारशेडसाठीच्या पर्यायी जागेसाठीच्या भेटी पूर्ण झालेल्या आहेत. त्यामध्ये कांजुरमार्ग येथील दोन जागा, वांद्रे – कुर्ला संकुल, कलिना (मुंबई विद्यापीठ), एसआरपीएफ मैदान (गोरेगाव) याठिकाणी भेटी झाली असल्याची माहिती एका सदस्याने दिली.सध्या समितीकडून रिपोर्ट लिहिण्यासाठीचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत आम्ही अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडबाबत समितीच्या नेमणुकीचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) विभागाच्या अध्यक्षतेत एक समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन्य संरक्षक अन्वर अहमद यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक यांनी मागणी केल्याप्रमाणे एसआरपीएफच्या जोगेश्वरीच्या जागेचा पर्याय सुचवला होता. समितीच्या सदस्यांनी याठिकाणीही भेट दिली आहे.

अहवालासाठी अजून 10 दिवस थांबा

- Advertisement -

नागपूर अधिवेशनामुळे या समितीमधील दोन सदस्य आठवडाभर या संपूर्ण प्रकरणाच्या अभ्यासासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे या आठवड्याभराच्या कालावधीत समितीला कामकाज करता आले नाही. राज्य सरकारला अहवाल सादर करण्यासाठी समितीला २५ डिसेंबरची मुदत होती. पण अहवालाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने आणखी दहा ते बारा दिवसांची मुदतवाढ मागण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या जागांची पाहणी

कांजुरमार्ग येथील दोन जागा
वांद्रे – कुर्ला संकुल,
कलिना (मुंबई विद्यापीठ),
एसआरपीएफ मैदान (गोरेगाव)

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -