घरमुंबईमुंबई लोकलमध्ये पुन्हा मर्कटलिला

मुंबई लोकलमध्ये पुन्हा मर्कटलिला

Subscribe

स्टंट करणार्‍यांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावरील चेंबूर आणि वडाळा रेल्वेस्थानकांदरम्यान लोकलमध्ये स्टंट करणार्‍या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मोसीन असे यातील स्टंट करणार्‍या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याचा एक अल्पवयीन नासिर मित्र देखील होता. हा स्टंट करत असताना वडाळा लोहमार्ग पोलिसांचा एक हवालदार या डब्ब्यात होता. त्याने हा स्टंट मोबाईलमध्ये कैद केला आणि या तरुणाला रोखून त्याला वडाळा स्थानकात त्यांना उतरवले. मोसीनला वडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुरुवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास चेंबूरहून वडाळा स्थानकात हवालदार सचिन पाटील हे ड्युटीवर येत होते. यावेळी सकाळी धावत्या लोकलमध्ये तरुण दरवाज्यात स्टंट करताना दिसले. पाटील यांनी त्या मुलांचा व्हीडिओ शूटिंग करत कारवाई करण्यासाठी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी 19 वर्षीय मोसीन आणि नासिर या दोघांना सह प्रवाशांच्या जिवितास धोका उत्पन्न करण्याचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तिसर्‍या स्टंट करणार्‍या तरुणाचा शोध सुरू असल्याचे वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.

- Advertisement -

सोशल स्टंटबाजी

लोकलमध्ये होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनासह रेल्वे सुरक्षा यंत्रणांकडून जनजागृती करण्यात येते. मात्र फेसबूक, यूट्यूब अशा ठिकाणी स्टंटचा व्हीडिओ अपलोड करुन तो व्हायरल करणे, समाजमाध्यमांवर व्हीडिओ टाकून त्याला ‘लाईक’ मिळवणे असा प्रकार तरुणाईकडून होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -