घरअर्थजगतफ्लिपकार्टकडून ‘समर्थ’ची सुरुवात

फ्लिपकार्टकडून ‘समर्थ’ची सुरुवात

Subscribe

भारताची आघाडीची ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट समर्थ’ची सुरुवात केली. भारतातले कारागीर, विणकर आणि हस्तकलेच्या कारागिरांना ई-कॉमर्सचे व्यासपीठ मिळवून देणारा हा क्रांतिकारी उपक्रम आहे. आजवर पिछाडीवर पडलेल्या या समुदायाला यामुळे राष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले होणार असून ई-कॉमर्सच्या वैशिष्ट्यांचा फायदा करून घेतानाच भारतभरातील १५ कोटींहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
केवळ बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यापुरतेच फ्लिपकार्ट समर्थ मर्यादित नसून या कारागिरांना नोंदणी प्रक्रियेपासून ते ऑनलाइन विक्री प्रक्रियेचा सराव होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत मिळण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी विशेष मदत, उत्पादनांचे कॅटलॉगिंग, अकाऊंट व्यवस्थापन, व्यवसायासंबंधी मार्गदर्शन, विक्रीसंदर्भात विशेष मदत, पात्र असेल त्या ठिकाणी कमी दलाली आणि गोदामांची मदत आदी विविध लाभांचा फ्लिपकार्ट समर्थ या उपक्रमात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -