घरमुंबईमुंबई महापालिका शिक्षण अधिकारीपदी राजेश कंकाळ यांची नियुक्ती

मुंबई महापालिका शिक्षण अधिकारीपदी राजेश कंकाळ यांची नियुक्ती

Subscribe

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राजेश कंकाळ (कोंकण -२) यांची मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी पदावर पदोन्नतीसह प्रतिनियुक्ती केली आहे. ते लवकरच आपला कार्यभार स्वीकारतील. यासंदर्भातील शासन निर्णय ९ डिसेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी पदावर यापूर्वी महेश पालकर यांनी ७ जुलै २०१६ पासून विविध आव्हानांना व संकटांना सामोरे जात सलग ५ वर्षे कामकाज केले होते. मात्र कोविड कालावधीतच २४ जुलै २०२१ रोजी महेश पालकर यांची शासन आदेशाने पुणे येथे बदली करण्यात आली. त्यामुळे तेव्हापासून उप शिक्षण अधिकारी राजू तडवी यांनी आजपर्यंत यशस्वीरित्या शिक्षण विभागाचा कार्यभार प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून सांभाळला.

- Advertisement -

नवीन शिक्षणाधिकारी यांच्यासमोरील आव्हाने

मुंबईत विविध भाषिक लोक राहतात. तसेच, आज संगणकीय युगात आधुनिक शिक्षणाची कास धरून आताच्या पिढीला शैक्षणिक धडे सुलभतेने देणे, टॅब, मोबाईल यांचा वापर करून कोविड काळात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे, ऑनलाईन शिक्षण देणे, त्यातच पालकांचा इंग्रजी शाळांकडे वाढता ओढा, मराठी शाळांचा घसरलेला टक्का, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची मानसिकता, कामकाजाची पद्धती समजावून घेणे व आणखीन विविध समस्या, आव्हाने यांना तोंड देणे आव्हानात्मक असणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -