घरमुंबईपोलीस, अग्निशमन कर्मचार्‍यांना बांधली राखी

पोलीस, अग्निशमन कर्मचार्‍यांना बांधली राखी

Subscribe

नगरपरिषद शाळेतील विद्यार्थिनींचे रक्षाबंधन

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींनी या सणाच्या निमित्ताने रात्रदिवस नागरिकांच्या रक्षणासाठी झटणार्‍या पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वृक्षांना राखी बांधून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
पोलीस शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवून सर्व नागरिकांचे रक्षण करीत असतात. अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी आग, पूर वा तत्सम आपत्कालीन प्रसंगी मदत व बचावकार्य करून नागरिकांचे रक्षण करीत असतात. तर वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करीत असतात. त्यामुळे या सर्व रक्षणकर्त्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वाना राखी बांधून आम्ही हा रक्षा बंधन सण साजरा केल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या डिजिटल शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका सुरेखा राऊत, उपशिक्षिका रजनी चव्हाण व तेजल झोपे आदीही उपस्थित होते. भाऊ बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला रक्षा बंधन सण घरोघरी मोठ्या उत्साहाने साजरा होतो.पण या सणाच्या निमित्ताने कुुुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींनी नागरिकांच्या रक्षणासाठी झटणार्‍या पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना तसेच पर्यावरण रक्षण करणार्‍या वृक्षांना रक्षाबंधन करून खूप मोलाचा संदेश दिला आहे.

- Advertisement -

पूर आग वा तत्सम आपत्कालीन समयी मदत व बचावकार्य करणे आमचे कर्तव्यच आहे. परंतु या चिमुकल्या बहिणींच्या रक्षा बंधनाने नक्कीच यासाठी आम्हाला अधिक बळ मिळेल.
-भागवत सोनोने, फायर ऑफिसर, कुळगाव बदलापूर नगर परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -