घरमुंबईपाणी टंचाईवर थ्री ‘आर’ची मात्रा

पाणी टंचाईवर थ्री ‘आर’ची मात्रा

Subscribe

 झेवियर्सच्या ‘मल्हार’मध्ये तज्ज्ञांनी माडले मत

भविष्यात भारतासमोर पाणीटंचाई हे मोठे संकट असणार आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारताने थ्री ‘आर’ला महत्त्व देणे गरजेचे आहे. थ्री ‘आर’ अर्थात रिड्यूस, रियूज आणि रिसायकल याची काटेकारपणे अंमलबजवणी केल्यास भविष्यातील पाणी युद्ध टाळणे शक्य असल्याचे मत संशोधक, विश्लेषक डॉ. जयंता बंद्योपाध्याय यांनी व्यक्त केले. झेवियर्स कॉलेजमध्ये सुरू असलेल्या ‘मल्हार’ कार्यक्रमात ‘पाणी युद्ध : भारताचे चिंताजनक भविष्य’ याविषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. गुरुवारी पहिल्या टप्प्यात मल्हारमध्ये देशातील विविध नामवंतांची व्याख्याने व चर्चासत्र घेण्यात आली. यावेळी पहिल्या सत्रामध्ये ‘पाणी युद्ध : भारताचे चिंताजनक भविष्य’ या चर्चासत्रामध्ये बंद्योपाध्याय यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या तीन ‘आर’ची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. पाण्याचा कमीतकमी वापर, पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्यावर प्रक्रिया केल्यास पाणीटंचाईचा सामना करणे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु या तीन ‘आर’ बाबत नागरिकांमध्ये जागरुकता करणेही गरजेचे आहे. त्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्याचे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे भारतामध्ये पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये धरणांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे नर्मदा बचाओ आंदोलनाचे कार्यकर्ते श्रीपाद धर्माधिकारी यांनी यावेळी विषद केले.

- Advertisement -

सक्षम व भविष्याची गरज लक्षात घेऊन धरणे बांधल्यास भारताला पाण्याचे व्यवस्थापन करणे सहज शक्य हाईल, असे सांगत त्यांनी शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी धरणांमुळे सहज उपलब्ध करता येऊ शकते. शेतीला योग्य पाणी मिळाल्यास शेतकर्‍यांसमोरील समस्याही दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. पाणी समस्या ही भारतात दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणी वाटपाबाबत अनेक प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहेत, परंतु पाणी समस्येचा प्रश्न निकालात काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. राजकारण्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांमधील समस्यांनुसार पाण्याचे वाटप करण्यास पुढाकार घेतल्यास हा प्रश्न सहज निकाली निघू शकतो, असे मत पर्यावरण तज्ज्ञ चंद्र भूषण यांनी व्यक्त केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन फोरम ऑफ इन्व्हायरमेंट जर्नालिस्ट इन इंडियाच्या अध्यक्ष केया आचार्य यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -