घरमुंबई"तुमचे निर्बंध घाला चुलीत....'', हिंदू सणांवरून राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“तुमचे निर्बंध घाला चुलीत….”, हिंदू सणांवरून राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

''तुमचे निर्बंध घाला चुलीत...मुख्यमंत्र्यांना पत्र'' असं म्हणत भाजप प्रवक्ता राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सातत्याने हिंदू सणांना विरोध करणार्‍या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून गुढीपाडवाच्या दिवशी मंत्र घोषित विधीवत हवन करणार असल्याचंही राम कदम यांनी सांगितलं.

”तुमचे निर्बंध घाला चुलीत…मुख्यमंत्र्यांना पत्र” असं म्हणत भाजप प्रवक्ता राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमिवर मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सातत्याने हिंदू सणांना विरोध करणार्‍या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी यावी म्हणून गुढीपाडवाच्या दिवशी मंत्र घोषित विधीवत हवन करणार असल्याचंही राम कदम यांनी सांगितलं.

 ”तुमचे निर्बंध घाला चुलीत… मुख्यमंत्र्यांना पत्र…सातत्याने हिन्दू सणांना विरोध करणार्‍या महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धि यावी म्हणून गुडीपाडवाच्या दिवशी… मंत्र घोषात विधीवत हवन करणार..”, असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे. शिवाय पत्रही ट्विट केलं आहे.

- Advertisement -

राम कदमांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आपल्या सरकारने पुन्हा एकदा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण गुढी पडावा आणि राम नवमी यावर निर्बंध घालण्याचा मानस नुकताच जाहीर केलाय.

- Advertisement -

म्हणजे हे करा, हे नका करू…

हे केल्यावर ही कारवाई… हे केल्यावर ही पोलीस केस.. ते केल्यावर ती पोलीस केस… हे जर केल तर तुरुंगात एवढे दिवस जाल.. हे जर केल तर येवढा दंड भरावा लागेल.. असे जाचक निर्बंध हिंदू सणांवर आपल सरकार का घालतंय ? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा आपल्या सरकारला सवाल आहे.

कोरोनाच्या संकट काळातून सावरत असताना अत्ता कुठे गाडी रुळावर आलीय लोक त्या भीतीच्या वातावरणातून मुक्त होऊन पारंपरिक परंपरागत आपले सण साजरे करतायत

आपल जीवनमान सुरळीत जगण्याचा प्रयत्न करतायत स्वताच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते प्रत्येकाला व्यवस्थित माहित आहे. पण सरकारने हे करा.. हे नका कारु.. अस सांगण्यापेक्षा लोकांना मुक्त पणे त्यांचे सण साजरे करू द्यावेत.. आम्हाला आमच्या जीवाची कशी काळजी घ्यायची ते व्यवस्थित ठाऊक आहे. होळीच्या वेळेस देखील आपल्या सरकारन शिमगा साजरा करायचा नाही म्हण्यन निर्बंध घातले. पोलीस केस करू अश्या धमक्या दिल्या. काय झाल सरकारला आमच्या विरोधा समोर सगळे निर्बंध मागे घ्यावे लागले

सरकार मध्ये अश्या कोणत्या शक्ती आहेत. कि त्या हिंदू विरोधी काम करतायत त्यांना हिंदूचे सण बघवत नाहीत. हिंदू सण आले कि त्यांना निर्बंध आठवतात. हे असे हिंदू विरोधी महाराष्ट्राच्या भूमीत ठेचून काढावेच लागतील. आपल्या सरकारला गुढी पाडवा आणि राम नवमी याच्यावर निर्बंध घालता येणार नाहीत. जर चुकून घातले गेलेत तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला म्हणावे लागेल कि

तुमचे निर्बंध गेले चुलीत.

आम्ही आमचा गुढी पाडवा व राम नवमी आणि येणारे सर्व हिंदू सण थाटात जल्लोषात ढोल ताश्या सहित साजरे करणारच,

राज्याचे प्रमुख म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे अश्या प्रकारचे कोणतेही हिंदू सनांवरील निर्बंध आपण आणि आपल्या सरकारने घालू नये. धन्यवाद !”, असं पत्र राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.


हेही वाचा – अलीकडे विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांचा मशिदींच्या भोंग्यांवरुन भाजपला टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -