घरमुंबईचोरीप्रकरणी रणबीर कपूरच्या बहिणीने मागितली माफी

चोरीप्रकरणी रणबीर कपूरच्या बहिणीने मागितली माफी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर हिच्यावर ज्वेलरीची डिझाइन चोरी केल्याचा आरोप सोशल मीडियावर लावण्यात आले होते. यानंतर रिद्धिमाने माफी मागितली आहे.

अभिनेता रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूर ने शेअर केलेल्या ज्वेलरीच्या फोटोबद्दल माफी मागितली आहे. रिद्धिमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच दुसऱ्या कंपनीच्या ज्वेलरीची डिझाइन आपली डिझाइन म्हणून प्राकाशित केली होती. ही ज्वेलरी डिझाइन दुसऱ्या कंपनीची असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. यानंतर तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माफीचे पोस्ट शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riddhima Kapoor Sahni (@riddhimakapoorsahniofficial) on

- Advertisement -

 काय आहे प्रकरण

रिद्धिमा कपूरने एक ज्वेलरी डिझाइन नुकतीच आपल्या इन्स्टाग्राम वरून शेअर केली होती. ही डिझाइन ‘कोकीची मिकीमोटो’ ची असल्याचा दावा करण्यात आला. रिद्धिमाने फक्त डिझाइनच नाही तर पूर्ण फोटोच कॉपी करून टाकला आहे. dietsabya ने दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये रिद्धिमाने शेअर केलेला फोटो आणि कोकीचे डिझाइन शेअर केले आहेत. कोकीची मिकीमोटो कंपनी जगामध्ये पर्ल किंग च्या नावाने ओळखली जाते. १९१६ पासून ही कपंनी दागिण्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -