घरमुंबईबीएमसीच्या मुख्यालयासमोरील सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पामुळे रस्ता सुरक्षितताच धोक्यात

बीएमसीच्या मुख्यालयासमोरील सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पामुळे रस्ता सुरक्षितताच धोक्यात

Subscribe

काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या मुख्यालयसमोर सौंदर्यीकरणासाठी नवीन प्रकल्प केला होता. मात्र याच प्रकल्पामुळे ४० वाहनांचा अपघात झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने तसेच ब्लूमबर्ग फिलॅन्टॉफिज यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यांवर विविध रंगाचे पट्टे मारुन कर्ब स्टोन, फुलझाडांच्या कुंड्यांसह प्लास्टिक बोलार्ड बसवण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर बनविण्यात आलेला हा प्रकल्प पूर्ण झाला असला तरी हा प्रकल्प अडचणीचा ठरला आहे. याठिकाणच्या कर्बस्टोन व बोलार्डमुळे मोठ्याप्रमाणात वाहनांचा अपघात होत असून रस्त्याचा आकारच यामुळे कमी केल्यामुळे वाहनांची निर्माण होणार्‍या कोंडीचा विचार करता हा प्रकल्पच रद्द करण्याची मागणी स्थायी समिती सदस्यांनी केली आहे.

सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ

सौंदर्यीकरणाच्या नावावर महापालिका प्रशासन सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत यापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक जावेद जुनेजा यांनी हरकतीच्या मुद्दा उपस्थित केला हेाता. या रस्ता सुरक्षितेतसाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पामुळे महिन्याभरात २० हून अधिक अपघात झाल्याची माहिती त्यांनी दिली होती. यावर उत्तर देताना प्रशासनाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ब्लूमबर्ग फिलॅन्टॉफिज आणि राज्य शासन यांच्यामध्ये रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात विविध ठिकाणी उपायायोजना तथा सुधारणा करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यामाध्यमातून सर्वप्रकारचा अभ्यास तसेच परवानगी घेऊनच हा प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच महापालिका मुख्यायलयासमोर बनवण्यात आल्याचे सांगितले. प्रायोगिक तत्वावर सुधारणा करण्याचा प्रस्ताव ब्लूमबर्ग फिलॅन्टॉफिज आणि त्यांचे भागीदार असलेले नॅक्टो यांनी महापालिकेला प्रस्ताव सादर केला होता. याला महापालकिा आयुक्त, सहआयुक्त (वाहतूक) तसेच मुंबई पुरातन वास्तू जतन समितीचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

या नवीन प्रकल्पामुळे ४० वाहनांचा अपघात 

हा प्रकल्प तात्पुरत्या स्वरुपाच असल्यामुळे आणि या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा पूर्णपणे नॅक्टो या संस्थेमार्फत करण्यात आला असल्याचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. परंतु या उत्तरावर सदस्यांचे समाधान झालेले नसून सपाचे रईस शेख यांनी आतापर्यंत ४० वाहनांनी बोलार्डला धक्का दिला आहे. त्यामुळे ४० वाहनांचा अपघात झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याचा अहवाल सादर करावा अशी सूचना केली. भाजपच्या ज्योती अळवणी यांनी महापालिका अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पट्टे मारत आहे, तर मग अनेक ठिकाणी झेब्रा कॉसिंग का रंगवले जात नाही असा सवाल केला. अनेक ठिकाणी दुभाजक रंगवले जात नाही, ते कधी रंगवून मिळणार असाही सवाल प्रशासनाला केला.
त्यामुळे महापालिका मुख्यालयासमोरील रस्ते रंगवून कर्बस्टोनसह बसवलेले बोलार्ड यामुळे रस्ते सुरक्षितताच धोक्यात आल्याने याठिकाणाहून हे सर्व कर्बस्टोनसह बोलार्डही काढावे लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी हा प्रकल्प निरीक्षणाखाली असला तरी याठिकाणी होणारे अपघात पाहता, त्यांना हा प्रकल्प गुंडाळावा लागणार असल्याचे दिसत आहे.


हेही वाचा – बेस्टला राज्य शासनाने अनुदान द्यावे – यशवंत जाधव

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -