घरमुंबईशाळांमध्ये तंबाखूमुक्त धोरण राबवण्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशनचा पुढाकार

शाळांमध्ये तंबाखूमुक्त धोरण राबवण्यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशनचा पुढाकार

Subscribe

आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशनकडून जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये तंबाखूमुक्त धोरण राबवण्यासाठी ३० जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसोबत ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था’ हा कार्यक्रम ‘सलाम मुंबई फाऊंडेशन’ या संस्थेकडून राबवण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसंच, शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये तंबाखूमक्त शैक्षणिक संस्था अभियान राबवण्याबाबत सलाम मुंबई फाऊंडेशन यांनी शासनाला प्रस्ताव सादर केला असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही संस्थेने दिले आहे. त्यानुसार, शाळांमध्ये तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबवण्यासाठी काही सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि धूम्रपान हा गुन्हा असल्याचे फलक तसेच तंबाखू सेवनास बंदी असल्याचे फलक शाळांमध्ये लावावेत, अशा सूचना शालेय विभागाला दिल्या आहेत. आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाऊंडेशनकडून जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात नागरिकांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहावे असं आवाहन केलं.

- Advertisement -

शाळांना देण्यात आलेल्या सूचना 

  • मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनाला बंदी असल्याची नोटीस काढावी. या नोटीसबाबत सर्वांना माहिती द्यावी. नोटीस दर्शनीय भागात लावावी.
  • शाळेत नियंत्रण समितीची स्थापना करावी आणि समितीची दर महिन्याला आढावा बेठक घ्यावी.
  • शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आणि धूम्रपान करणे गुन्हा आहे असे पक्के फलक लावावेत.
  • पोस्टर्स, बॅनर्समधून तंबाखूच्या दुष्परिणाबाबत माहिती द्यावी.
  • शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर पूर्णत: बंदी आहे अशा आशयाचे फलक लावावे.

असे अनेक निकष पूर्ण झाल्यावर शाळेच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ तंबाखूमुक्त शाळा असा फलक लावावा. शिवाय, शाळेचे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसमोर शाळा तंबाखूमुक्त असल्याचं घोषित करावं.
या सूचनांचे परिपत्रक राज्यातील शाळांना देण्यात आले असून शाळांनी हे नियम पाळावे, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -