घरमुंबईराजकारणासाठीच सावरकरांची बदनामी

राजकारणासाठीच सावरकरांची बदनामी

Subscribe

स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्येप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडले असतानाही भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांकडून त्यांच्या बदनामीची मोहीम उघडण्यात आली आहे. ते माफीवीर होते, गांधीहत्या हे त्यांचेच कारस्थान असे आरोप केले जाऊ लागले आहेत, हे बदनामीकारक आरोप कसे खोटे आहेत, हे जनतेला समजावून सांगणे हे राष्ट्रीय कर्तव्य बनले आहे, असे प्रतिपादन निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांनी या विषयावर बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई येथे व्याख्यानात केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह सुमेधा मराठे तसेच मान्यवर उपस्थित होते. न्यायालयाने सावरकरांना संशयाचा फायदा घेऊन नव्हे तर कोणताच पुरावा नाही म्हणून निर्दोष ठरविले होते. सरकारच्या वतीने सावरकरांविरुद्ध फक्त एकच माफीचा साक्षीदार तोही दिगंबर बडगे याचा एकमेव पुरावा सादर करण्यात आला होता. तोही अविश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने म्हटले.

- Advertisement -

1975 साली मनोहर माळगांवकर यांनी याच विषयावर लिहिलेल्या पुस्तकात बडगेची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात बडगेने स्पष्ट केले होते की, पोलिसांच्या छळामुळे मला न्यायालयात सावरकरांच्या विरोधात साक्ष देणे भाग पडले होते. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पण, याबद्दल अद्यापही सरकारने व पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेले नाही, याचा अर्थ बडगेने माळगांवकरांना खरे तेच सांगितले व सावरकरांना खोटे पुरावे तयार करून आरोपी करण्यात आले होते, असेही मोरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -