घरमुंबईमरणाच्या दारात नेणारी शाळेची बस रोखली

मरणाच्या दारात नेणारी शाळेची बस रोखली

Subscribe

पालघरमधील सुंदरम शाळेच्या बसचालकाचा विद्यार्थ्यांना धोक्यात घालणारा ढिसाळ कारभार समोर आला. या घटनेमुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाच चाकांवर धावली १५ किमी

एक चाक नसतानाही १०-१५ विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून पालघरमधील सुंदरम सेंट्रल शाळेची बस केवळ पाच चाकांवर झोकांड्या खात जवळपास पंधरा किलोमीटर धावली. एका जागरुक नागरिकाने वेळीच हा प्रकार पाहिल्याने त्याने तातडीने बस थांबण्यासाठी प्रयत्न केल्याने सांभाव्य दुर्घटना टळली. मात्र या प्रकरणी सुंदरम शाळेच्या बसचालकाचा विद्यार्थ्यांना धोक्यात घालणारा ढिसाळ कारभार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सुंदरम शाळेच्या ड्रायव्हरचा प्रताप

मंगळवारी सकाळी मनोरहून पालघरच्या दिशेने विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची एक बस झोकांड्या खात धावत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बस मार्गावरील घाटात कलंडताना वाचली. बसच्या मागून गाडीने येणाऱ्या नागरिकांनी पाठलाग करून ही बस अडवली. तेव्हा या बसला एक चाकच नसल्याचे पाहिल्यावर नागरिकांना मोठा धक्का बसला. सहा चाकी असलेल्या या बसच्या मागचे एक चाक गायब असल्याचे त्यांना दिसून आले. तसेच ही बस चालवणाऱ्या चालकाकडे लायसन्स आणि बॅचही नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणी चालकाकडे विचारणा केली असता, मी या बसचा ड्रायव्हर नसून मला संदीप विचारे यांनी बळजबरीने या बसवर पाठवले, अशी कबुली चालक संदीप वरठा याने दिली.

- Advertisement -

दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी बचावले 

या बसमध्ये चौथी-पाचवीतील १५ मुले होती. या बसमुळे त्यांच्या जीवाला मोठा धोका होता. नागरिकांनी अडवल्यानंतरही चालकाने बस शाळेच्या दिशेने पुढे नेली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -