घरमनोरंजनअनुकृतीच्या डोक्यावर फेमिना मिस इंडियाचा ताज!

अनुकृतीच्या डोक्यावर फेमिना मिस इंडियाचा ताज!

Subscribe

तामिळनाडूच्या अनुकृती वासने फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईतल्या वरळी इथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हरयाणाच्या मीनाक्षी चौधरीला प्रथम उपविजेती पदाचा आणि आंध्रप्रदेशची श्रेया रावला दुसऱ्या उपविजेते पदाचा मान मिळाला आहे.

कोण होणार मिस इंडिया २०१८? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून तामिळनाडूच्या अनुकृती वासने फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. २९ स्पर्धकांमधून अनुकृती वास फेमिना मिस इंडिया २०१८च्या विजेती पदाची मानकरी ठरली आहे. यावेळी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या हस्ते अनुकृतीला मिस इंडियाचा मुकूट घातला गेला. या स्पर्धेत हरयाणाच्या मीनाक्षी चौधरीला प्रथम उपविजेती पदाचा आणि आंध्रप्रदेशची श्रेया रावला दुसऱ्या उपविजेते पदाचा मान मिळाला आहे.

कोण आहे अनुकृती वास?

मुळची तामिळनाडूची असलेली अनुकृती वास व्यवसायाने खेळाडू आणि नृत्यांगना आहे. आईच्या स्वप्नपूर्तीसाठी अनुकृती फ्रेंच भाषेत बीए करत आहे. सुपर मॉडेल होण्याचे अनुकृतीचे स्वप्न आहे.

- Advertisement -

कुठे पार पडली स्पर्धा

वरळीतल्या एसएसआयआय डोम येथे फेमिना मिस इंडिया २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. स्पर्धेला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींदेखील हजेरी लावली होती. जॅकलिन फर्नांडिस, माधुरी दीक्षित, करीना कपूर यांनी केलेल्या धमाकेदार डान्सने कार्यक्रमाची रंगत वाढली. तर आयुष्यमान खुराना आणि करण जोहरने या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -