घरमुंबईवैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांची सुरक्षा महागली!; सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा

वैद्यकीय महाविद्यालये संलग्नित रुग्णालयांची सुरक्षा महागली!; सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा

Subscribe

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना संरक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून 14 वैद्यकीय महाविद्यालयांसाठी सुरक्षारक्षक सेवा घेतली होती. आता या सुरक्षारक्षकांच्या वेतनात तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारी तिजोरीवर महिन्याला अतिरिक्त बोजा पडणार आहे. (Security of hospitals attached to medical colleges became expensive Additional burden on government exchequer)

हेही वाचा – मलेरिया, डेंग्यूला रोखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली; डासांची उत्पत्तीस्थळे केली नष्ट

- Advertisement -

डॉक्टरवर वारंवार होणारे हल्ले आणि नातेवाइकांकडून रुग्णालयाची होणारी तोडफोड त्याअनुषंगाने 2015 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षेकरिता उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार 2017 साली 14 शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये एकूण 1088 सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.

2018 साली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर 2019 पासून सर्व पदांकरिता 3000 रुपये प्रतिमाह वाढविले असल्याने सुधारित दर आकारण्यात येणार असल्याचे विभागाला कळविले होते. महामंडळाने कळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने आता 3000 रुपये वाढीव दरानुसार देय असलेले मानधन देण्याचा विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1088 सुरक्षारक्षकांच्या पगारात वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर महिन्याला 32 लाख 64 हजारांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाणी, रस्ते, पूल आणि बरेच काही; केसरकरांच्या जनता दरबारात नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

सुरक्षा रक्षकांची नेमणूक का?

रुग्ण दगावल्यानंतर नातेवाइकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढ झाली आहे. विशेषत: शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण होतना दिसते. या घटनांना आळाा घालण्याकरिता सरकारने 2017 साली 14 वैद्यकीय महाविद्यालयांत व रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -