घरमुंबईगडकरींंच्या पूर्तीतील रखवालदार तीन महिने पगाराविना

गडकरींंच्या पूर्तीतील रखवालदार तीन महिने पगाराविना

Subscribe

मुंबई: केंद्रिय मंत्री नितीन गडकरी अध्यक्ष असलेल्या पूर्ती सहकारी साखर कारखान्याच्या ३६ रखवालदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून या सुरक्षारक्षकांना वेतन देण्यात आलेले नाही. यामुळे जगायचे कसे, अशा विवंचनेत हे कर्मचारी आणि त्यांचे नातलग आहेत.

विदर्भातील भंडारा येथे पूर्तीचा हा साखर कारखाना असून, पूर्तीच्या सुरक्षेसाठी ३५ सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. गेली काही वर्षे हे सुरक्षा रक्षक पूर्तीत कार्यरत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या सुरक्षा रक्षकांना वेतन देण्यात न आल्याने वेतनासाठी या सुरक्षा रक्षकांनी कंपनीकडे रितसर दाद मागितली होती. मात्र कुठलीही दाद या कारखान्याने या कर्मचार्‍यांना दिली नाही.

- Advertisement -

अखेर याचा निषेध म्हणून उपोषण करण्याचा निर्धार या सुरक्षा रक्षकांनी घेतला. १२ सप्टेंबरपासून या रक्षकांनी सुरू केले. ते काही दिवस सुरू होते. मानस ग्रूपकडून पैसेच येत नसल्याने आपण पगार देऊ शकत नसल्याचे मानस ग्र्रूपचे अधिकारी परमार यांनी सांगितले. या कर्मचार्‍यांना कामावर घेतांना आठ हजार इतके वेतन निश्चित करण्यात आले होते. हा कामगार कायद्याचाही भंग होता. पुढे १२ तासांच्या कामाला ८ हजार रुपये वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

आता तर आठ हजार इतकेही वेतन देण्याची तयारी कंत्राटदाराची नाही. केवळ साडेसहा हजार रुपये इतकाच पगार देता येईल, असे कर्मचार्‍यांना सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना १२ तास राबवले जात असून, ओव्हरटाईम देण्याचे नाव संबंधित करत नाहीत. उलट अधिकारातील वेतनही दिले जात नसल्याबाबतही कोणीच कारखान्याला विचारत नसल्याचे सांगण्यात आले. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील पूर्तीचा हा कारखाना असतानाही कर्मचार्‍यांना वेतनाविना कसेकाय ठेवण्यात आले, हा एक गंभीर प्रश्न असल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -