घरमहाराष्ट्रपाणी, रस्ते, पूल आणि बरेच काही; केसरकरांच्या जनता दरबारात नागरिकांनी वाचला तक्रारींचा...

पाणी, रस्ते, पूल आणि बरेच काही; केसरकरांच्या जनता दरबारात नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

Subscribe

मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपली असून निवडणूकही दीड वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे सध्या पालिकेत महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते नगरसेवक वगैरे कोणीही नाही.

मुंबई : मुंबई उपनगर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (4 ऑक्टोबर) महापालिका मुख्यालयातील नवीन कार्यालयात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक व सामान्य नागरिकांकडून पाणी, एसआरए, रस्ते, पूल, इमारत, कामगार कल्याण केंद्र, सोसायटी आदींबाबत तक्रारींचा पाढा वाचला. तसेच, पालिकेच्या संदर्भात आपल्या तोंडी तक्रारी केल्या आणि लेखी निवेदनेही सादर केली. त्यानंतर पालकमंत्री केसरकर यांनी पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याशी चर्चा केली. अशा प्रकारे बुधवारी काहीशा उशिराने पहिला जनता दरबार पार पडला. (Water roads bridges and more Citizens read complaints in Kesarkars Janata Durbar)

मुंबई महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपली असून निवडणूकही दीड वर्षांपासून रखडली आहे. त्यामुळे सध्या पालिकेत महापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, गटनेते नगरसेवक वगैरे कोणीही नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या नागरी समस्या रखडल्या आहेत. मात्र भाजपने नागरी समस्या सोडविण्यासाठी शहर विभागाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कार्यालय मागून घेतले. आता याच कार्यालयातून पालिकेचे कामकाज काही प्रमाणात हाताळले जात आहे. त्याचा भाजपला आगामी निवडणुकीत लाभ होणार आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या एका माजी नगरसेविकेने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पालिकेत नागरी समस्या सोडविण्यासाठी कार्यालय उपलब्ध करण्याबाबत आग्रह धरल्याचे व त्यास पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बुधवारपासून त्यांनीही जनता दरबार सुरू केला.

- Advertisement -

हेही वाचा : दहा तासांच्या चौकशीनंतर ‘आप’च्या खासदारास अटक; ED ची कारवाई

नागरिक, दिव्यांग व्यक्ती, माजी नगरसेवक मांडल्या समस्या

बुधवारी दुपारी 1 ते 4 या कालावधीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. मात्र पालकमंत्री केसरकर यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाची जबाबदारीही असल्याने कदाचित या कारणास्तव आज त्यांना पालिकेत पहिला जनता दरबार सुरू करण्यास काहीसा उशिर झाला. यावेळी उपस्थित सामान्य नागरिक, दिव्यांग व्यक्ती, माजी नगरसेवक आदी 30 – 40 जणांनी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे नागरी समस्यांबाबत तक्रारी केल्या. आज जनता दरबारात सामान्य जनतेपासून ते माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, माजी नगरसेवक व विभाग 12 चे विभागप्रमुख दिलीप नाईक, माजी आरोग्य समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक अमेय घोले आदी मान्यवरही उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : ‘हे गतिमान नाही तर, हत्यारे सरकार!’ आरोग्य समस्येवरुन विजय वडेट्टीवारांनी डागली तोफ

वडाळा येथे फूट ओव्हर ब्रिजची आवश्यकता- तृष्णा विश्वासराव

मुंबई महापालिकेतील माजी सभागृह नेत्या व माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी, वडाळा, गेट नंबर-4 येथे फूट ओव्हर ब्रिज नसल्याने झोपडपट्टीमधील अनेक मुलांना जीव धोक्यात घालून शाळा, कॉलेजमध्ये जावे लागत असल्याची तक्रार पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली. सदर ठिकणी जर फूट ओव्हर ब्रिज बांधल्यास त्याचा मुलांना वापर करता येईल, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे, तृष्णा विश्वासराव यांच्या विभागात काही ठिकाणी पाण्याची कमतरता भासत असून काही ठिकाणी गढूळ पाण्याची समस्या असल्याची तक्रारही त्यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे एसआरए योजने अंतर्गत एका इमारतीचे काम रखडले असून बिल्डरने योजनेत पात्र राहिवाशांचे तीन वर्षांपासून भाडे रखडविले असल्याची तक्रारही त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -