घरक्राइमSerial Bomb Blast: 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी निर्दोष! अजमेर कोर्टाचा...

Serial Bomb Blast: 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी निर्दोष! अजमेर कोर्टाचा निकाल

Subscribe

राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निकाल दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 31 वर्षांनंतर सर्वजण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत होते. आता न्यायालयाने अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. तर टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन या दोघांना दोषी ठरवले.

जयपूर : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांतील आरोपीबाबत मोठा निकाल अजमेर कोर्टाने दिला आहे. या बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. टाडा कायद्यान्वये न्यायालयाने अब्दुल करीम टुंडा यास कोणत्याही प्रकरणात दोषी ठरवले नाही हे विशेष. (Serial Bomb Blast The main accused in the 1993 serial bomb blast acquitted Judgment of Ajmer Court)

राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निकाल दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 31 वर्षांनंतर सर्वजण न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत होते. आता न्यायालयाने अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता केली आहे. तर टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन या दोघांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊमधील रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले होते. याप्रकरणी अब्दुल करिम टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते. सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Modi Sabha : महायुती सरकारने 12 कोटींचे केले तरी काय? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रश्न

ही आहे अब्दुल करीम टुंडाची ओळख

अब्दुल करीम टुंडा हा उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पिलखुवा येथे सुतारकीचे काम करत असे. अब्दुल करीम टुंडा लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. टुंडाने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून दहशत पसरवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा दावाही केला जात आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर दहशतवाद्यांनी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. याप्रकरणी एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली होती. या स्फोटातील पीडित वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत होते. आता टाटा कोर्टाने या प्रकरणी अंतिम निकाल दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Jitendra Awhad : ‘मगर ये देश रहना चाहिये’…वाजपेयींचा व्हिडीओ पोस्ट करत आव्हाडांनी टोचले भाजपचे कान

23 फेब्रुवारीपासून राखीव ठेवला होता निकाल

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर टाडा न्यायालयाने 23 फेब्रुवारी रोजी निर्णय राखून ठेवला होता. मशिदीत सभेदरम्यान पाईप गनने गोळीबार केल्याने अब्दुल करीम याचा एक हात गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून त्याचे नाव टुंडा पडले होते. टुंडाला 1993 च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी बनवण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -