घरमुंबईअल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा सरियल रेपिस्ट अटकेत

अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा सरियल रेपिस्ट अटकेत

Subscribe

.

दै आपलं महानगरने सर्वप्रथम चेहरा उजेडात आणलेला अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या नराधमाला नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रेहान कुरेशी असे या नराधमाचे नाव असून त्याच्यावर पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.एका संशयित सिरियल रेपिस्टने १४ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे वृत्त दै. आपलं महानगरने दि. २१ सप्टेंबरच्या अंकात पहिल्या पानावर दिले होते. त्यावेळी त्या नराधम बलात्कारीचा चेहरा प्रथम लोकांपुढे आणला होता. तो बलात्कारी नालासोपारामध्ये आल्याची माहिती आठवड्यापूर्वी पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वसई विरार, नालासोपारा आणि नवी मुंबईत तब्बल १३ बलात्कार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी अटक केली. रेहानला कोपरखैरणे येथील बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली ऊसन त्याच्यावर एकून १४ गुन्हे दाखल आहेत. यातील नवी मुंबईत ७, मुंबई, उरण येथे प्रत्येकी दोन आणि पालघर जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर लॅपटॉप ताब्यात घेतला. रेहान मूळचा युपीचा असून तो मिरारोडला राहण्यास आहे.
पोलिसांनी अधिक तपास केला असता त्याच्याकडे पासपोर्ट मिळाला आहे.

- Advertisement -

त्याच्या पासपोर्ट व इतर कागदपत्रांवर वेगवेगळा पत्ता आहे. त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रामधून मिळालेल्या माहितीनुसार तो १२ वी पास असल्याचे समोर आले आहे. तसेच गुन्हे करताना त्याने वापरलेले कपडे घरातुन ताब्यात घेतले आहेत. सध्या तो बेरोजगार असून सहा महिन्यापूर्वी सेल्समनचे काम करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी दिली.या प्रकरणाची अधिक माहिती मिळावी यासाठी तपासासाठी सहायक पोलिस आयुक्तांचे एसआयटी पथक नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

संखेश्वरनगरमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार

नालासोपारा पुर्वेच्या संखेश्वरनगरमध्ये १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याने एव्हरशाईन नगर येथे अशाच पध्दतीने मुलीला फूस लावून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ’सिरियल रेपिस्ट’ला पकडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली होती. पीडित मुलींनी दिलेल्या माहितीवरून त्याचे रेखाचित्रे बनवून पाठवण्यात आली होती. तसेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांना जे सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते, त्यातून त्याचा शोध घेतला जात होता. नवी मुंबईत दोन तर नालासोपारासह विरार मध्ये 13 अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केल्याचे गुन्हे दाखल आहेत

- Advertisement -

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर येथे गेल्या काही दिवसांपासून रेहान अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. अल्पवयीन मुलींना गाठून ’तुझ्या वडिलांनी बोलावले आहे’, ’तुझ्या वडिलांनी पत्र दिले आहे’ अशा सबबी सांगून निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगत कपडे काढायला सांगायचा आणि मग त्या मुलीवर बलात्कार करायचा. आठ दिवसांपूर्वी तो नालासोपारा येथे दिसला होता.

असा घेतला शोध

गेल्या काही महिन्यांपासून ज्या-ज्या ठिकाणी अल्पवयीन मुला-मुलींवर बलात्कार झाले त्या-त्या ठिकाणचे हजारो मोबाईल फोन नंबर पोलिसांनी मिळवले, यादरम्यान एका नंबरवर पोलिसांना संशय बळावला होता. कारण हा मोबाईलचे बलात्काराच्या ठिकाणीच मोबाईल टॉवरवर लोकेशन दिसून आले होते. यामुळे त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. बुधवारी या मोबाईल नंबरचे लोकेशन मिरा रोड येथील शीतलनगर परिसरात मिळताच पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर शोध घेत आरोपीला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आत्तापर्यंत १४ गुन्हे दाखल असून तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -