घरताज्या घडामोडीसंतापजनक! ८ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

संतापजनक! ८ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

Subscribe

एका आठ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या धारावी परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे.

एका आठ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या धारावी परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमके काय घडले?

धारावीत एका आठ वर्षाच्या मुलावर लैगिंग अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी २३ वर्षाच्या व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नांगरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

धारावीत राहणाऱ्या एका ८ वर्षीच्या मुलाला गुरुवारी रात्री एका २३ वर्षीय तरुणाने खाऊचे आमिष दाखवून आडोशाला आणले. त्यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून आरोपींनी त्याठिकाणी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – वाढत्या गोंधळामुळे बदल्यांची 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -