घरमहाराष्ट्रElection Commission ने महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या आयटी सेलकडे सोपवला सोशल मीडिया

Election Commission ने महाराष्ट्र निवडणुकीत भाजपच्या आयटी सेलकडे सोपवला सोशल मीडिया

Subscribe

साकेत गोखले यांनी एकामागोमाग एक ट्विट करत केले गंभीर आरोप

देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याचा दावा करणारा निवडणूक आयोग आता पक्षपात आणि डेटा लीकच्या गंभीर आरोपांनी घेरला गेला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख करण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आयटी सेलकडे देण्यात आली होती. सोशल मीडिया हँडल आणि राजकीय पक्षांच्या पेजवर बारीक नजर ठेवणं हे निवडणूक आयोगाचं काम होतं. परंतु स्वत: निवडणूक आयोगाने सोशल मीडिया हँडल्स, वेबसाइट्स, पेज आणि डेटा एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाच्या व्यावसायिक अधिकाऱ्यांकडे देण्यात आलं होतं. आयोगावर दबाव आणल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी हालचाली तीव्र करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने आता महाराष्ट्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या आरोपांवर उत्तर मागितलं आहे. आयोगाच्या प्रवक्त्याला याबाबत आणि त्यांच्या ट्विटबाबत विचारलं असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर हे सांगितलं जाईल, असं सांगितलं. तथापि, धक्कादायक खुलासा म्हणजे, सोशल मीडियावर संपूर्ण निवडणूक अभियानावर आणि निवडणूक आयोगाच्या जन जागरण मोहिमेवर नजर ठेवण्याचं काम ज्या कंपनीला आणि व्यक्तीला देण्यात आलं होतं, ते भाजप युवा संघटना बीजेवायएमचे म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या आयटी सेलचे संयोजकही आहेत. देवांग दवे असं त्यांचं नाव असून सोशल सेंट्रल मीडिया सोल्यूशन एलएलपी अशी त्यांची कंपनी आहे.

- Advertisement -

आयोगाला उत्तर द्यावं लागणार

निवडणूक आयोगाने आपल्या सोशल मीडिया हँडल आणि पेजवर तसंच कंपनी आणि व्यक्तीवर समान पत्ता लिहिला होता. सोशल सेंट्रल मीडियाच्या ग्राहकांच्या यादीमध्ये भाजप आणि महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हे देखील स्पष्ट करावं लागणार आहे की त्यांच्या वेबसाइट, मीडिया हँडल, पेज, त्याच्यावरील जाहिरातीवरील वरील पत्ता २०२, प्रेस मॅन हाऊस, नेहरू रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई. म्हणजेच तीच कंपनी जी भाजप आणि कमिशनच्या सोशल नेटवर्किंगचं काम बघते!

माजी पत्रकाराने उपस्थित केला प्रश्न

माजी पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित केला आहे. गुरुवारी संध्याकाळी पोस्ट केलेल्या ट्विटर थ्रेडमध्ये गोखले यांनी नमूद केलं की, महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या काही जाहिराती पाहताना लक्षात आलं की त्या पत्त्यात मुंबईतील विलेपार्ले येथील कार्यालयाचा पत्ता आहे.

ते म्हणाले, “पत्ता २०२ प्रेस मॅन हाऊस, विलेपार्ले, मुंबई होता. तो कोणाचा पत्ता आहे हे शोधण्याचं मी ठरवलं. तर ती कंपनी निघाली साइनपोस्ट इंडिया, जी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सरकारच्या अखत्यारीत चालवली जाणारी संस्था होती.”

त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये पुढे म्हटलं की, “पण थांबा – ही अर्धी गोष्ट नाही आहे. २०२ प्रेस मॅन हाऊस पत्ता सोशल सेंट्रल नावाच्या डिजिटल एजन्सीद्वारे देखील वापरला गेला होता. ही एजन्सी देवांग दवे यांच्याकडे आहे, जे भाजप युवा संघटना, बीजेवायएमचे आयटी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत.”

हा आरोप निराधार – देवांग दवे

हा आरोप देवांग दवे यांनी फेटाळला आहे. माझ्या प्रतिष्ठेवर डाग लावण्यासाठी पूर्णपणे निराधार आरोप केले गेले आहेत. कारण मी अत्यंत नम्र मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून आलो आहे. माझ्या कुटुंबाची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मी पुढे जात आहे म्हणून काही लोक जळत आहेत आणि मला लक्ष्य करीत आहेत. मी कायदेशीर कारवाई करेन. दरम्यान, साकेत गोखले यांनी केलेल्या आरोपांबाबत भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय, या खुलाशानंतर सीईओ महाराष्ट्र काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -