घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरशरद पवार केंद्र सरकारविरोधात आक्रमक, केंद्रीय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला केला विरोध

शरद पवार केंद्र सरकारविरोधात आक्रमक, केंद्रीय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला केला विरोध

Subscribe

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या होणाऱ्या बीडमधील सभेसाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले शरद पवार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती संभाजीनगर : केंद्रातील मोदी सरकार स्थळांचे, शहरांचे नाव बदल असतानाच विविध कायदे आणून देशात बदल घडवत आहे. दरम्यान अशातच आता केंद्रातील मोदी सरकाने सीबीएसईने शाळांमध्ये फाळणी स्मरणदिन साजरा करण्यासाठी नुकतेच पत्रक काढले आहे. या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध केला असून, या आदेशाला आक्रमकपणे विरोध करा असे आवाहन त्यांनी केले आहे.(Sharad Pawar aggressive against the central government opposed the order issued by the Union Education Department)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्या होणाऱ्या बीडमधील सभेसाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले शरद पवार आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयाना हात घालत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, समाजात जो उन्माद वाढला आहे, यामागे मोदी सरकारचे निर्णय आहेत. या निर्णयांमुळे लोकांमध्ये कटुता वाढते आहे. याचे ताजे उदाहण म्हणजे आपल्या देशात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत ज्या सीबीएसईच्या नियंत्रणाखाली चालतात. या सीबीएसईला केंद्राच्या संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते. 10 ऑगस्ट रोजी या सीबीएसईने नवे परिपत्रक काढत 14 ऑगस्ट 2023 हा दिवस ‘फाळणी स्मरण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. फाळणीच्या घटनेमुळे जी कटुता निर्माण झाली होती त्यातून देशबाहेर येत असताना केंद्राने याचे स्मरण करा म्हणते आहे. याविरोधात निषेध आंदोलन केले पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘काँग्रेसी विचारांचेच आमच्यासोबत राहातील’, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे वक्तव्य

इंडिया आघाडीच्या बैठकीत मुद्दा मांडू

पुढे याच विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्राने काढलेल्या या आदेशाचा मुद्दा हा आम्ही महाविकास आघाडी इंडियाच्या होणाऱ्या बैठकीत मांडू. याला विरोध कसा करायचा यावरही निर्णय घेऊ असेही यावेळी शरद पवार म्हणाले.ॉ

- Advertisement -

हेही वाचा : “मुंबईतील ‘इंडिया’ आघाडीची बैठक देशाला दिशा देणारी ठरेल”, नाना पटोलेंचा विश्वास

केंद्र सरकारवर साधला निशाणा

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने काढलेल्या या आदेशाचा अर्थ स्पष्ट होतो की, हे सरकार समाजात कटुता निर्माण करणे, जातीधर्मात तेढ वाढवणे आणि अंतर वाढवण्याचे काम करत आहे. या आघाडीतील सर्व सदस्यांच्या हे लक्षात आणून देऊ की याविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी. आपापल्या राज्यामध्ये शाळांमध्ये असे दिन साजरे होऊ नयेत यासाठी आक्रमक झाले पाहिजे अशी भूमिका यावेळी शरद पवार यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -