घरमुंबईInternational Yoga Day: फिटनेस क्विन शिल्पाचा योगमंत्र!

International Yoga Day: फिटनेस क्विन शिल्पाचा योगमंत्र!

Subscribe

आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जून रोजी सर्वत्र साजरा केला जात आहे. देशभरातले १३ कोटी लोक देशाच्या कानाकोपऱ्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगासने करत आहेत. या योगसाधनेत बॉलिवूडचे सेलिब्रिटी देखील मागे नाही. आतंरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असणाऱ्या योग शिबीरात उपस्थित राहिली. यावेळी योगाचे महत्त्व, योगसाधना करणं आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असते हे शिल्पा शेट्टीने उपस्थित असणाऱ्या सर्वांना सांगितले. या ठिकाणी उपस्थितीत असणाऱ्या सर्वांनीच योगाचा आनंद घेत उत्साहात योग दिवस साजरा केला आहे.

योगसाधना करणे आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग करायला हवा, तसेच दिवसातून १० मिनिटांचा स्वतःसाठी वेळ काढून प्राणायमही आवर्जून करायला हवे, असेही शिल्पा शेट्टीने सांगितले.

- Advertisement -

शिल्पा शेट्टीला खास फिटनेस क्वीन म्हणून ओळखले जाते. शिल्पा ही योगा आणि जिम करून स्वतः तर फिट राहते परंतु, ती इतरांना देखील प्रोत्साहित करते. नुकतीच शिल्पाने आपले फिटनेस अॅफ लाँच केले आहे. SS APP असे या अॅपचे नाव असून आपल्या चाहत्यांना खास भेट देण्यासाठीच तिने हे अॅप तयार केल्याचे सांगितले. योग आणि साधना हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग असला पाहिजे. दिवसातून १० मिनिटांचा वेळ स्वतःसाठी काढा. प्राणायमही आवर्जून करा असेही शिल्पा शेट्टीने सांगितले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -