घरमुंबईमहिला उद्योजकांचा फॅशन रॅम्पवॉकवर जलवा

महिला उद्योजकांचा फॅशन रॅम्पवॉकवर जलवा

Subscribe

ज्या महिला लघु उद्योजकांचे स्वतःचे बुटीक आहे किंवा ज्या महिला घरून आपला फॅशन आणि लाईफस्टाइल व्यवसाय चालवतात अशा उद्योजकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी ठरला

मुंबई – फॅशन आणि लाईफस्टाईल इंडस्ट्रीशी संलग्न असलेल्या ठाणे-मुंबईतील महिला लघुउद्योजकांसाठी बिट्स अॅण्ड बाईट्सतर्फे फॅशन परेड २०२३ या फॅशन शो रॅम्पवॉकचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. वांद्र्यातील एमआयजी क्लबवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिला उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माय महानगर मानिनी आणि ठाणे वैभव या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.

ज्या महिला लघु उद्योजकांचे स्वतःचे बुटीक आहे किंवा ज्या महिला घरून आपला फॅशन आणि लाईफस्टाइल व्यवसाय चालवतात अशा उद्योजकांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी ठरला. या कार्यक्रमात ज्वेलरी, कपडे, हेअरस्टाइल, मेकअप आदी ब्रॅण्ड लोकांसमोर आणण्यासाठी, या व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे अनेक महिला उद्योजकांनी आपल्या ब्रॅण्डची संकल्पना लोकांसमोर उत्स्फूर्तपणे मांडली.

- Advertisement -

ही कोणतीही स्पर्धा नसून यामध्यमातून लघु उद्योजिका आपला ब्रॅण्ड, आपले कलेक्शन लॉन्च पॅडवर लॉन्च करण्यात आल्याची प्रतिक्रिया कार्यक्रम आयोजकांनी दिली. जे ब्रॅण्ड यात सहभागी झाले होते त्या सर्व स्टार्ट अप आणि एमएसएमइ महिला उद्योजिका होत्या. या फॅशन परेडमध्ये २२ महिला लघु उद्योजिकांनी सहभाग घेतला. रॅम्पवॉकमध्ये सहभागी झालेले मॉडेल्स हे सर्वसामान्य नोकरी करणारे महिला-पुरुष होत्या. तर, काही महाविद्यालयीन तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही या रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -