घरदेश-विदेशशिवसेनेने केले भुजबळांना टार्गेट

शिवसेनेने केले भुजबळांना टार्गेट

Subscribe

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याच्या वावड्या नेहमीप्रमाणे पसरायला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षात भुजबळांना ‘टार्गेट’ करत त्यांचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसलेली दिसत आहे. शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या नाशिक जिल्हा दौर्‍यात याची शिवसैनिकांनी प्रचिती घेतली. ‘आपलं महानगर’ने मिर्लेकर यांच्याशी संपर्क साधत याबाबत विचारले असता त्यांनी टार्गेटचा मुद्दा नाकारला असला तरीही त्यांची भाषणे मात्र काही वेगळेच सांगून जात आहेत.

एकेकाळी आपल्या आक्रमक बाण्याने विरोधकांना पळता भुई थोडी करणारे व शिवसेनेचा ‘ढाण्या वाघ’ म्हणून संबोधले जाणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पक्ष बदलाच्या अफवा प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पसरत असतात. सुमारे २७ वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर ते शरद पवारांबरोबर बाहेर पडले. राष्ट्रवादीनेही त्यांना उपमुख्यमंत्रिपद व महत्वाची मंत्रिपदे दिल

- Advertisement -

असे असतानाही भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे भुजबळांनाही अशा अफवांची सवय झाली आहे. त्यामुळे यावर ते फारशा प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. शिवसेना मात्र भुजबळांवरील राग सोडायला तयार नाही. भुजबळांनी हा पक्ष सोडल्यापासूनच सेनेकडून त्यांच्यावर वारंवार विविध पातळ्यांवर प्रहार केले गेले आहेत. शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर हे जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झाले असता, त्यांनीही भुजबळांवर टीका करण्याची एकही संधी गमावली नाही.

भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदार संघात त्यांनी सभा घेऊन गेल्या वेळी फक्त २५ हजार मतांनी कमी पडलो होतो, ही मते वाढवा आणि या मतदारसंघावरही भगवा फडकवा, असे आवाहन शिवसैनिकांना केले. त्यादृष्टीने सभेनंतर काही विशिष्ट पदाधिकार्‍यांशी चर्चा करत मोर्चे बांधणीही केली. नांदगाव-मनमाड मतदार संघात त्यांनी पंकज भुजबळांच्या कामकाजाचा समाचार घेतला. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीतही भुजबळ परिवाराकडे अंगुलीनिर्देश करत त्यांनी जेथे भुजबळ तेथे त्यांना पराभूत करून भगवा फडकवण्याचे आवाहन केल्याचे काही शिवसैनिकांकडूनच सांगितले जाते.

- Advertisement -

इतकेच नाही तर शिवसेनेकडून येवला आणि नांदगाव मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केले गेलेले दिसते. दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या मतदार संघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने या मतदार संघाची माहितीही मागविण्यात आली असून भुजबळांना नामोहरम करण्यासाठी कंबर कसली आहे.

भुजबळांसह सर्वच शत्रूंना धूळ चारणार

भुजबळांची धास्ती आम्हाला अजिबातच नाही. त्यांना आम्ही दोनदा पाडलेले आहे. शिवाय मध्यंतरी ते तुरुंगात गेल्यामुळे त्यांची प्रतिमा फार चांगली राहिली असेल असे वाटत नाही. शत्रू कमकुवत की बलवान आहे हे पाहण्यापेक्षा आपण किती बलवान आहोत, याकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या संघटन बळावर आम्ही भुजबळांसह सर्वच शत्रूंना धूळ चारण्यासाठी सज्ज झालो आहोत, हे खरे. – रवींद्र मिर्लेकर, उपनेते शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -