घरमुंबईमातोश्रीवरील 'त्या' चार नगरसेवकांची फेरी फुकट

मातोश्रीवरील ‘त्या’ चार नगरसेवकांची फेरी फुकट

Subscribe

गुरुवारी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. कारण शिवसेनेचे चार सदस्य उशिरा पोहोचले. त्यामुळे त्या चार सदस्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आले.

मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांचा प्रस्ताव मंजूर झाल्याने शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहेत. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीला उशिरा पोहोचलेल्या शिवसेनेच्या चार नगरसेवकांना जबाबदार ठरवले जात आहे. त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागितल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात आमच्याकडून ‘मातोश्री’ वरून असे कोणतेही स्पष्टीकरण मागितले नसल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. आम्ही ‘मातोश्री’वर पक्षप्रमुखांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तिथे आम्हाला कळाले की आम्हाला कुणी बोलावलेच नव्हते. त्यामुळे स्पष्टीकरण देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडचे बांधकाम आरे कॉलनीच्या जागेमध्ये उभारले जात आहे. यामधील बाधित होणारी झाडे कापणे आणि पुनर्रोपित करण्याचा प्रस्ताव गुरुवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत आयुक्तांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केला.

…यामुळे झाले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नाराज

शिवसेनेने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला, पण आयुक्तांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मदत घेऊन तसेच काँग्रेसच्या दोन सदस्यांनी सभात्याग केल्याचा फायदा उठवत तो मंजूर केला. सत्ताधारी पक्षाला हा प्रस्ताव नामंजूर करायचा होता. तरीही आयुक्तांनी योग्य प्रकारच्या फ्लोर मॅनेजमेंट करत प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी प्राधिकरणाचे सदस्य जे उशिराने सभेसाठी मुख्यालयात पोहोचले,त्या सर्वांची झाडाझडती घेण्यासाठी मातोश्रीवर बोलावले होते. सुवर्णा करंजे, प्रीती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उद्यान व बाजार समिती अध्यक्ष उमेश माने या चौघांकडून लेखी स्पष्टीकरण मागून घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

- Advertisement -

नक्की वाचाबैठकीला उशिरा पोहोचलेल्या नगरसेवकांची मातोश्रीवर झाडाझडती


शिवसेना पक्षप्रमुख यांनी कोणतेही स्पष्टीकरण यासंदर्भात मागितलेले नाही

मात्र या चारही नगरसेवकांच्यावतीने ज्येष्ठ नगरसेविका आणि प्राधिकरणाच्या सदस्य सुवर्णा करंजे यांनी खंडन केले आहे. आमच्याकडून शिवसेना पक्षप्रमुख यांनी कोणतेही स्पष्टीकरण यासंदर्भात मागितलेले नाही. आम्हाला गुरुवारी मातोश्रीवर यावे असा निरोप आला होता. त्यानुसार आम्ही ‘मातोश्री’वर पोहोचलो होतो. परंतु तिथे पोहोचल्यानंतर आम्ही विचारणा केली, तेव्हा तुम्हाला इथे कुणी बोलावले असा प्रश्न केला. त्यामुळे आम्हाला बोलावलेच नसल्याचा निरोप मिळाल्यानंतर आम्ही तसेच माघारी परतलो. त्यावरून c आमच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण मागितले नाही, हे स्पष्ट होते. तरीसुद्धा माध्यमांमध्ये आमच्याकडून स्पष्टीकरण मागितल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

आम्ही मतदानात पूर्णपणे भाग घेतला

आम्ही बैठकीसाठी १२.२० या वेळेस स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनात पोहोचलो होतो आणि तिथे बसून सर्वजण सभेसाठी निघून गेलो. यामध्ये आम्हाला अध्यक्षांनी कोणतीही सूचना केली नाही. नेहमीच्या बैठकीत जसे जातो, तसेच आम्ही गेलो होतो. आम्ही मतदानात पूर्णपणे भाग घेतलेला आहे. तरीही जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या बातम्या का येतात याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहेत. जर याबाबत आम्हाला आदल्या दिवशी कल्पना दिली असती, तर आम्ही ११ वाजताच सभेला उपस्थित राहिलो असतो, असेही त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचाआरेतील झाडे तोडण्यासाठी सदस्यांनी घेतली दीड कोटीची लाच


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -