घरमहाराष्ट्रघरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना ७ वर्षांची कोठडी; १०० कोटींचा दंड

घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना ७ वर्षांची कोठडी; १०० कोटींचा दंड

Subscribe

जिल्हा न्यायालय सर्व दोषींना करणार शिक्षा जाहीर

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात ४५ कोटी रुपयांचा अपहाराबाबत आज निकाल लागला आहे. सुरुवातीला ५७ संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ४९ संशयितांबाबत हा निकाल येणार आहे. सुनावणी दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते तो निकाल आज जाहीर झाला आहे.


हेही वाचाः जळगाव घरकुल घोटाळ्याचा आज निकाल

जिल्हा न्यायालय सर्व दोषींना करणार शिक्षा जाहीर

दरम्यान, बहुचर्चित ४५ कोटींच्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ संशयित आरोपींना धुळे जिल्हा कोर्टाने शनिवारी दोषी ठरवले. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा न्यायालयाने या सर्वांना शिक्षा जाहीर केली आहे.

- Advertisement -

यापैकी सुरेश जैन यांना १०० कोटीचा दंड तर ७ वर्षाचा कारावासाची शिक्षा, गुलाबराव देवकर यांना ५ कोटींचा दंड तर ५ वर्षाची शिक्षा जाहीर केली आहे. तसेच, प्रदीप रायसोनी यांना ७ वर्षाच्या शिक्षेसह १० लाखांचा दंडाची शिक्षा जाहीर केली असून जगन्नाथ वाणी यांना ७ वर्षाच्या शिक्षेसह ४० लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, घरकुल घोटाळ्यात इतरांना १ ते ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून माफीचा साक्षीदार सिंधू कोल्हे यांचा स्वतंत्र खटला चालवला जाणार आहे.

तसेच सर्व आरोपींना ताब्यात घेण्याचे पोलिसांना आदेश धुळे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी दिले आहे. या खटल्यात माजीमंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, राजा मयूर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ५२ आरोपी आहेत. यातील तीन आरोपी मृत झाले असून एक आरोपी फरार आहे. न्या. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर खटल्याचे कामकाज झाले त्यावेळी या खटल्यातील सर्व ४८ संशयित आरोपी हजर होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -