घरताज्या घडामोडीGoa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेना - NCP जागावाटप बुधवारी जाहीर...

Goa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेना – NCP जागावाटप बुधवारी जाहीर होणार – संजय राऊत

Subscribe

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आज गोव्यात पोहचणार आहेत. तर शिवसेनेचे नेते उद्या गोव्यात दाखल होतील. गोव्यात कोण कुठून लढणार यासाठीची चर्चा बुधवारी होईल, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. गोव्यातील जागा वाटपाबाबत बुधवारी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज गोव्यात दाखल होत आहे. मीदेखील उद्या बुधवारी गोव्यात पोहचणार आहे. त्यानंतर एनसीपीकडून उद्या गोव्यातील जागेसाठीची यादी जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले. तर शिवसेनेचीही यादी उद्याच जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यापैकी कोण कुठून जागा लढवणार याबाबतची चर्चा उद्या होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गोव्यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. त्यामध्ये आम आदमी पार्टीपासून ते टीएमसी अशा अनेक पक्षांना आपला उमेदवार जिंकून यावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

बुधवारी दोन्ही पक्षांमध्ये सीट शेअरींगवर चर्चा होणे अपेक्षित आहे. शिवेसना गोव्यात १० ते १५ जागांवर लढू शकते. तर एनसीपीचे वरिष्ठ नेता प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केल्यानुसार या चर्चेनंतरच कोण किती जागांवर लढणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. कॉंग्रेसचे राहुल गांधी हे गोव्यात आघाडी करण्यासाठी तयार होते. पण स्थानिक नेतृत्वाने वेगळा विचार केल्याने या आघाडीत कॉंग्रेस नसणार आहे.


Goa Election : आमच्या दबावाने भाजपला उत्पल पर्रिकरांना तिकिट द्यावेच लागेल – संजय राऊत

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -