घरमुंबईपोलिसांवरील हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव

पोलिसांवरील हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव

Subscribe

चार वर्षांमध्ये गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती. गेल्या चार वर्षांपासून पोलिसांवर होणारे हल्ले वाढले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने 'सामना' मुखपृष्ठातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

गेल्या चार वर्षांपासून पोलिसांवर होणारे हल्ले वाढले आहेत. दरम्यान, या चार वर्षांपासून गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने ‘सामना’ मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अग्रलेखात लिहिले आहे की, महाराष्ट्रात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील, हा प्रश्न विचारला जावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था नेहमीच उत्तम असते. त्यांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्थेचा अर्थ वेगळा असतो. मुख्यमंत्री, मंत्री, सत्ताधारी पक्षाच्या ‘वतनदार’ लोकांचे आदेश ऐकून पोलीस ठाण्यातील मंडळींनी सर्व वाल्यांची खातीर केली की सगळे उत्तमच चाललेय असे ते मानतात, असे शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा – नुसती आश्वासनं, जनतेच्या नशिबी दगडधोंडेही नाहीत – शिवसेना

नेमकं काय म्हटले आहे शिवसेनेने?

  • या महिन्याच्या सुरुवातीला दारू तस्कराने चंद्रपूर जिह्यातील नागभीड पोलीस ठाण्याचे फौजदार छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवून चिरडून मारले. चिडे यांची हत्या दारू तस्करीच्या वादातून झाली व त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लोकप्रियतेसाठी जिह्यात दारूबंदीची घोषणा केली; पण संपूर्ण विदर्भात दारूचा महापूर धोधो वाहत आहे. बाजूच्या राज्यातून ट्रकच्या ट्रक दारूच्या बाटल्या घेऊन चंद्रपुरात बेकायदेशीरपणे येत आहेत. लोक बाजूच्या जिह्यात व सीमावर्ती राज्यात जाऊन घसा गरम करून येतात. त्यामुळे दारूबंदीचा साफ फज्जा उडून सरकारचे हसे झाले आहे.
  • पूर्वी गडचिरोली, चंद्रपुरात बदली म्हणजे जन्मठेपेची शिक्षा वाटत होती. आता चंद्रपुरात बदली करून घेण्यासाठी कोटी कोटी रुपये मोजले जातात. कारण जिथे बंदी तिथे चांदी हा कायद्याचा नियम बनला आहे. त्यातून एखादा छत्रपती चिडे हा प्रामाणिकपणे दारूबंदी राबविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यास ठार मारले जाते. प्रकरण एकटय़ा छत्रपती चिडेंचे नाही, तर गेल्या चार वर्षांत पेलिसांना मोठय़ा प्रमाणात प्राण गमवावे लागले व पोलिसांवरील सर्वाधिक हल्ले हे विदर्भात झाल्याच्या नोंदी आहेत.
  • सी.आय.डी.ने जी आकडेवारी याबाबत प्रसिद्ध केली ती चिंताजनक आहे. सी.आय.डी.च्या २०१६ च्या गुन्हे अहवालानुसार २०१५ मध्ये साधारण ३७० पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले. २०१६ मध्ये ४२८ पोलिसांवर हल्ले झाले. त्यात ५६ पोलिसांना मरण पत्करावे लागले. सर्वाधिक पोलीस बळी चंद्रपुरात (११) गेले व त्यासाठी लादलेली दारूबंदी व दारू तस्करी हे मुख्य कारण आहे.
  • पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याची वृत्ती सत्ताधारी पक्षाच्या लोकांत वाढली आहे. हे चित्र चांगले नाही. कायद्याला बाप व पोलीस ठाण्यांना मालक निर्माण होतात तेव्हा ते कायद्याचे राज्य नसते. गुंडांना, चोरांना राजकीय कार्यकर्ता म्हणून सत्ताधाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश मिळतो व पोलिसांनी ज्यांना काल गुंड म्हणून ठोकलेले असते त्या गुंडांनाच सलाम करावा लागतो. २०१४ पासून पोलिसांवर हल्ले वाढले हा गृहखात्याचा पराभव आहे. पोलीस मार खात आहेत. हे चित्र असेच राहिले तर राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -