घरमहाराष्ट्रनुसती आश्वासनं, जनतेच्या नशिबी दगडधोंडेही नाहीत - शिवसेना

नुसती आश्वासनं, जनतेच्या नशिबी दगडधोंडेही नाहीत – शिवसेना

Subscribe

भाजप निवडणुका लढवण्यासाठी सध्या फटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचं काम करत आहे. पण यामुळे जनतेला ऊब मिळणार का? असा सवाल शिवसेनेने सामन्याच्या अग्रलेखातून विचारला आहे.

निवडणुकांदरम्यान दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवरुन शिवसेनेने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्यप्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होत. याचाच दाखला देत शिवसेनेने भाजपवर तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी अशीच आश्वासनं दिली होती. मात्र, गेल्या ५ वर्षात जनतेच्या हातात दगडधोंडेही पडले नाहीत, अशा धारधार शब्दांत टीका शिवसनेने केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आता राहुल गांधीही याच मार्गावर चालत आहेत. जात,धर्म, गोत्र, आई-वडील हेच प्रचाराचे मुद्दे ठरत असून, आता भाजपला राममंदिर आणि हिंदुत्वही नकोसं झाल्याची टीका शिवसेनेने केली आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप निवडणुका लढवण्यासाठी सध्या फटक्या गोधड्यांना ठिगळं लावण्याचं काम करत आहे. पण यामुळे जनतेला ऊब मिळणार का? असा सवाल शिवसेनेने अग्रलेखातून विचारला आहे.

निवडणुकीत दिली जाणारी आश्वासनं ‘जुमलेबाजी’ ठरु नये याची काळजी यापुढे सगळयांनीच घेण्याची गरज आहे, असा सल्लाही सेनेने दिला आहे. निवडणुकांपूर्वी लोकप्रियता मिळवण्यासाठी भरमसाट आश्वासनं देतात आणि सत्ता मिळाल्यावर त्यांचा विसर पडतो. हे सगळे जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत, अशी टीका सेनेने केली आहे. अग्रलेखात शिवसेनेने मांडलेल्या काही प्रमुख मुद्द्यांवर एक नजर :

अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे – 

  • विरोधी पक्ष आणि सरकारने एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षी दुष्काळ दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
  • सत्ताधाऱ्यांना आता राममंदिर आणि हिंदुत्व नको झाले आहे. गोंधळाकडून गोंधळाकडे यालाच म्हणतात.
  • निवडणुकांमागून निवडणुका जिंकायच्या आणि त्यामध्ये समाधान मानायचं, ही एक प्रकारे भांगेची नशा आहे.
  • निवडणुका लढण्यासाठी फाटक्या गोधड्यांनी ठिगळं लावण्याचं काम सुरु
  • विधानसभा अधिवेशन दुष्काळप्रश्नी कामी लागावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
  • जात, प्रांत, पंथात फाटलेला देश हिंदुत्वाच्या वज्रमुठीनेच एकत्र राहू शकतो हेच आमचे मत आहे.
  • उद्या महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक प्रचारात ४ राज्यांतील निवडणुकांप्रमाणेच जुमलेबाजीचा धुरळा उडेल.
  • काँग्रेसने मागच्या काळात काही केले नाही म्हणून तुमच्या पाच- दहा वर्षांच्या कालखंडात काही करायचे नाही, ही राजकीय संस्कृतीच देशाला घातक ठरत आहे.

वाचा: मुंबईकरांचे स्वप्नातले घर महागणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -